शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

शिकाऱ्यांच्या फासकीत अडकला बिबट्या; पायाचा पंजा तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 8:39 PM

खोडशीतील घटना : वन विभागाने केली सुटका; पायाचा पंजा तुटल्याने बिबट्या जखमी

कऱ्हाड : नदीकाठावरील शिवारात शिकाऱ्यांनी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. खोडशी, ता. कऱ्हाड येथे मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फासकीतून निसटण्याच्या प्रयत्नात बिबट्याच्या पंजाला जखम झाली असून वन विभागाने त्याला ताब्यात घेत औषधोपचार सुरू केले आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, खोडशी येथे कृष्णा नदीकाठी सावकार वस्ती नावाचे शिवार असून या शिवारात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे. या शिवारात सोमवारी रात्री अज्ञात शिकाऱ्यांनी शिकारीसाठी फासकी लावली होती. या फासकीवर पाय पडल्यामुळे बिबट्याचा पंजा त्यामध्ये अडकला. फासकीतून सुटका करुन घेण्यासाठी त्याने धडपड केली. त्यामध्ये त्याचा पंजाही पुर्णपणे तुटला.

दरम्यान, मंगळवारी सकाळी काही शेतकरी शेतामध्ये निघालेले असताना त्यांना फासकीत अडकलेला बिबट्या दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. तसेच पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वायजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वनपाल बाबूराव कदम, वनरक्षक रमेश जाधवर त्याठिकाणी पोहोचले. याचवेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे पोलीस फौजफाटाही त्याठिकाणी मागविण्यात आला. पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना हटवले. यावेळी ग्रामस्थांची पोलिसांशी शाब्दिक चकमकही उडाली. ग्रामस्थांची गर्दी कमी झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फासकीत अडकलेल्या बिबट्याला जाळी टाकून पकडले. तसेच पिंजऱ्यात घालून सुरक्षितस्थळी हलविले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याच्या पायावर उपचार सुरू केले आहेत.मध्यप्रदेशचा ‘बहेली ट्रॅप’ खोडशीत!

बिबट्या ज्या फासकीत अडकला त्या फासकीला बहेली ट्रॅप असे म्हणतात. मध्यप्रदेश येथील ही शिकाऱ्यांची टोळी देशभरात वाघाच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यांची शिकार करण्याची पद्धत वेगळी असून ते जी फासकी वापरतात तीच फासकी खोडशीत बिबट्याच्या पायामध्ये आढळून आली आहे. त्यामुळे वन विभागाने कसून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :leopardबिबट्या