लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पोलीस कर्मचार्याने रमजानसाठीची प्रार्थना म्हणजेच नमाज चक्क रिकाम्या रस्त्यावर अदा केला. त्यांचे इतर सहकारी त्यांना नमाज अदा करताना प्रात्साहित करत असल्याचे पहायला मिळत होते.रविवारी आंध्र प्रदेशात कर्तव्यावर तैनात असताना पोलिसाने रस्त्यावर रमजानची नमाज अदा केली. अधिकाऱयाच्या समर्पणाचे त्यांचे सहकारी या घटनेचे साक्षीदार आहेत. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुंटूर शहरातील लालापेट पोलिस स्टेशनमध्ये तैनात करीमुल्लाह, सहायक उपनिरीक्षक लॉकडाउन अंमलबजावणी कर्तव्यावर आहेत. ही घटना रविवारी घडली.रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करत असलेल्या गणवेशातील या कर्तव्यदक्ष पोलिसाने कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तर स्वीकारलीच इतकेच नव्हे तर रिकाम्या रस्त्यावर प्रार्थना देखील केली. जेव्हा नमाज अदा करण्यासाठी ते गुडघ्यावर खाली बसले, तेव्हा वेगवेगळ्या धर्माच्या त्याच्या सहकार्यांनी त्यांची प्रार्थना कोणतीही बाधा न येऊ देता बिनधास्त होऊ दिली.सोशल मिडियावर करीमुल्लाह यांच्या समर्पणाचे आता जिल्हा म्हणून कौतुक केले जात आहे आणि विशेषत:आंध्र प्रदेशातील गुंटूर शहराला कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका बसला आहे आणि केंद्राने हा जिल्हा रेड झोन म्हणून घोषित केलाआहे. दुसरीकडे कर्तव्य निभावणाऱ्या या पोलिसाने प्रार्थना केल्याने टीका देखील सोशल मीडियावरील इतर काहींनी केली.
बळ दे झुंजायाला... लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावताना पोलिसाने अदा केला नमाज; नेटिझन्सचा सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 4:00 PM
रविवारी आंध्र प्रदेशात कर्तव्यावर तैनात असताना पोलिसाने रस्त्यावर रमजानची नमाज अदा केली.
ठळक मुद्देसोशल मिडियावर करीमुल्लाह यांच्या समर्पणाचे आता जिल्हा म्हणून कौतुक केले जात आहे दुसरीकडे कर्तव्य निभावणाऱ्या या पोलिसाने प्रार्थना केल्याने टीका देखील सोशल मीडियावरील इतर काहींनी केली.