उल्हासनगर : मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुखसह पुतण्या तन्मेष यांना जिवेठार मारण्याची धमकीपत्र कार्यालयात आल्याने, एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगरमनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांचे कॅम्प नं-४ येथील लालचक्की चौकात कार्यलय आहे. रविवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान कार्यालय बंद करण्यासाठी पुतण्या तन्मेष गेला होता. त्यावेळी कार्यालयात एक कागद पडलेला असून त्यामध्ये बंडू देशमुख व तन्मेष यांना जिवेठार मारण्याची धमकीचे लिहिले होते.
तन्मेष याने हे पत्र उघडून पाहिले असता त्यावर "तू आणि तन्मेष हिशोबात राहा, नाहीतर दोघांना संपवून टाकू. जास्त मस्ती आली आहे तुम्हाला, खास करून त्या तन्मेषला.. समजावून ठेव त्याला!" असा मजकूर प्रिंट केलेला आढळला. त्यामुळं बंडू देशमुख यांनी याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
तन्मेष याने धमकीचे पत्राबाबत बंडू देशमुख यांना माहिती दिल्यावर, त्यांनी कोणीतरी मज्जाक केली असेल असे वाटले. मात्र त्यानंतर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. शहर मनसेकडून धमकी पत्राचा निषेध करण्यात येत आहे.