Amritsar Crime News : पंजाबच्या अमृतसरमधून नात्यांना काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका पत्नी इन्शुरन्स पॉलिसी हडपण्यासाठी आपल्या पतीची हत्या केली. पोलिसांनी अटक केलेल्या महिलेने सांगितलं की, तिचा पती बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता. ज्यामुळे घराचा खर्च चालवण्यात अडचण येत होती. मुलांच्या शिक्षणांचा खर्च करणंही अवघड झालं होतं.
डीएसपी सुखविंदर सिंह यांनी सांगितलं की, ५ मे रोजी सकाळी मंजीत सिंह पत्नी नरिंदर कौरसोबत व्यास हॉस्पिटमध्ये औषधं घेण्यासाठी निघाला होता. त्यानंतर त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह डेहरीवाल रस्त्यावर आढळून आला. तर त्याची पत्नी जखमी अवस्थेत होती. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. जखमी पत्नी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकरणाची चौकशी केली गेली.
चौकशीतून पोलिसांना असं आढळून आलं की, मंजीत सिंह गेल्या २ वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांनी हैराण होता. त्याच्यावर व्यास हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ज्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च करण्यात समस्या येत होती. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होतं.
मृत व्यक्तीची पत्नी एलआयसी एजंट होती. तिने तिच्या पतीचा १५ लाख रूपयांचा विमा काढला होता. नॉमिनी स्वत: होती. अशात तिला आयडिया आली की, जर पतीची हत्या झाली तर विम्याचे पैसे तिला मिळतील. त्यानंतर तिने पतीच्या हत्येचं प्लानिंग सुरू केलं. एक दिवस ती पतीसोबत हॉस्पिटल जात होती तेव्हा त्याची हत्या करण्यात आली.
डीसीपी सुखविंदर पाल सिंह यांनी सांगितलं की, पतीच्या हत्येप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांना शंका येऊ नये म्हणून हत्येची घटना चोरीची असल्याचं सांगण्यात आलं.