शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: राज्यात एक दिवसाचा दुखवटा; NCPA मध्ये घेता येणार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
2
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
3
Ratan Tata Taj Hotel: 'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...!
4
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्चा देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
5
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
6
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसारखे दिसतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
7
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
8
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
9
Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट
10
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
11
"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?
12
Ratan Tata : दानशूर! त्सुनामी असो किंवा कोरोनाचा उद्रेक... प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर
13
"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट
14
"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट
15
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
16
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
17
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
18
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
19
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
20
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते

संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 8:43 PM

Life Imprisonment : सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने ठरवला योग्य

मुंबई : संशयावरून २० वर्षीय प्रेयसीची हत्या हॉटेलमध्ये केल्यानंतर तिथेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने योग्य ठरविली.

‘मुलीच्या प्रियकराच्या हातून हत्येचे निघृण कृत्य’ असे म्हणत न्या. प्रसन्ना वराळे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम केली. मुलीच्या अंगावर १९ गंभीर जखमा पाहून त्याने पीडितेची हत्या करण्यासाठी कशाप्रकारे कट रचला होता, हे समजते, असे न्यायालयाने म्हटले. २७ जून रोजी न्यायालयाने निकाल दिला. मात्र, निकालाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली.आरोपीने (३०) त्याची प्रेयसी समांथा फर्नांडिस हिने विश्वासघात केल्याच्या संशयावरून २००८ मध्ये तिची हॉटेलमध्ये हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:ला जखमी करून व विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मे २०१२ मध्ये सत्र न्यायालयाने आरोपीला हत्या व आत्महत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २० मार्च २००८ रोजी आरोपी व पीडिता हे रबाळे येथील एका हॉटेलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. पोलीस दोघांनाही घेऊन रुग्णालयात पोहचले. शरीरावर १९ जखमा असलेल्या समांथाला रुग्णालयाने मृत घोषित केले. आरोपी शुद्धीवर आल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली.

आरोपीचा अपील फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे स्पष्ट आहेत आणि परिस्थितीवरून आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. तसचे पीडितेची हत्या करण्याचा आरोपीचा हेतू सिद्ध करण्यासाठीही समाधानकारक पुरावे आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आपल्या प्रेयसीवर तीन अज्ञात लोकांनी हल्ला केल्याचा आरोपीचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. ही खोटी कहाणी असल्याचे न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईPoliceपोलिसDeathमृत्यूLife Imprisonmentजन्मठेप