नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: पंचवटीतील टोळीयुद्धातून २०१७ मध्ये झालेल्या खुनाच्या प्रकरणात चौघांना व प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून यात गणेश उघडे, जितेश मुर्तडक, संतोष पगारे, संतोष उघडे, शेखर निकम व केतन निकम या आरोपींचा समावेश आहे.
पंचवटीतील २०१७ मधील खुनांच्या खटल्याचे निकाल दिले. यात न्यायाधीश वर्धन देसाई यांच्या न्यायालयाने किरण राहूल निकम खुन खटल्यात गणेश आशोक उघडे, जितेश उर्फ बंडू संपत मुर्तडक, संतोष विजय पगारे, संतोष अशोक उघडे या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर न्यायाधीश आदिती कदम यांच्या न्यायालायाने डाळींब व्यापारी संदीप लाड यांच्यावरील गोळीबार करून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात शेखर राहूल निकम व केतन राहूल निकम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.