हितेंन नाईक
पालघर - मनोर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या निहे फरले पाडा येथील आरोपी शरद देऊ काटेला वय ३३वर्ष ह्याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजारी राहणाऱ्या आपली सख्खी काकी लक्षी काटेला (वय वय ५५वर्षे)आणि चुलत भाऊ सखाराम काटेला(वय २७वर्षे)यांना ठार मारल्या प्रकरणी पालघर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ.मकरंद देशपांडे यांनी आरोपीला जन्मठेप आणि ९ हजार रोख रक्कमेची शिक्षा ठोठावली.
मनोर जवळील निहे फरले पाडा येथे काटेला कुटुंबीयांची अनेक घरे आहेत.ह्या पाड्यात आरोपी शरद काटेला आणि त्याचा सख्खा चुलत भाऊ सखाराम काटेला ह्या दोघांमध्ये मोठा वाद होता.ह्या वादातून आरोपी शरद ह्याने सखाराम आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्या प्रकरणी मनोर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.तुमच्या मुळे मला जेल मध्ये जावे लागले हा राग आरोपी च्या मनात खदखदत होता. दि.४ऑगस्ट २०१७ रोजी ह्या प्रकरणातील मृत सखाराम हा सकाळी आपल्या मोटारसायकल वरून कामावर जात असताना आरोपीने मनातील जुना राग उकरून काढत सखाराम शी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.ह्यावेळी सुरू झालेल्या भांडणात आरोपीने सखाराम च्या डोक्यात आपल्या हातातील लाकडी दांडक्याने प्रहार केला.ह्या फटक्याने सखाराम रक्तबंबाळ झाल्याने त्याला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या त्याची आई लक्ष्मी आणि पत्नी सुचिता ह्यांच्या डोक्यात ही दांडक्याने जोरदार प्रहार करीत आरोपी शरद जंगलात पळून गेला.ह्या घटनेत सखाराम ह्याचा जागीच मृत्यू झाल्या नंतर जखमींना उपचारासाठी मनोर च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर पुढील उपचारासाठी केंद्रशासित प्रदेश सिल्वासा येथील रुग्णालयात नेण्यात आले.ह्यावेळी उपचारादरम्यान लक्ष्मी हीचाही मृत्यू झाला.पोलिसांनी ह्या प्रकरणी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत पोनी.महेश पाटील आणि टीम ने आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.
पालघर न्यायालयात हे प्रकरण सुनावणीस आल्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. मनोर पोलिसांनी सादर केलेले भक्कम पुरावे आणि सरकारी वकील ऍड.एस बी सावंत ह्यांनी प्रभावी युक्तिवाद करीत न्यायाधीश डॉ.देशपांडे ह्यांच्या समोर मांडल्या नंतर त्यांनी आरोपीला जन्मठेप व ९ हजाराचा दंड ठोठावला.ह्या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून फौजदार भरत गावीत ह्यांनी काम पाहिले.