ठाणे - या नशीबवान माणसाचं नाव आहे ब्रिजेशकुमार राम महेश मसहा (वय - २५). उत्तर प्रदेशला बस्ती येथे राहणारा ब्रिजेशकुमार बस्तीहून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) तिकीटावर प्रवास करत होता. ठाण्याला ही एक्सप्रेस थांबत नसतानाही त्याने या वेगवान गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल या प्रवाश्याला कोणतीही गंभीर जखम नसल्याने त्याच्यवर प्रथमोचार करून घरी जाऊ देण्यात आले. गोरखपूरहून एलटीटीला जाणारी गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ठाणेरेल्वेस्थानकातून जात असताना एका प्रवाश्याने प्लॅटफॉर्मवर उडी मारली. दरम्यान तो प्लॅटफॉर्मऐवजी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामधल्या फटीत अडकून फरफटत गेला. प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबर अरुण कुमार यांनी त्याला पाहिलले आणि ते त्वरित धावत गेले. त्यांनी ओरडून प्रवाशांना आपत्कालीन साखळी ओढायला सांगितली. तोपर्यंत ट्रेन थांबली होती. कॉन्स्टेबल यशोदानंद हे देखील धावत तिथे पोहोचले. दोघांनी त्या प्रवाशाला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामधून सुखरुप बाहेर काढले. गेल्या आठ दिवसात आरपीएफच्या जवानांची हि बहाद्दूरिचे दर्शन घडविणारी दुसरी घटना आहे.