आविष्कार देसाई
रायगड - भारतात फिरण्यासाठी आलेल्या तीन परदेशी नागरिकांना लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. तीनही पर्यटक हे इराक देशातील असल्याची माहिती मिळत आहे. परदेशातील त्यांच्या नातेवाईकांना धमकी देत खंडणी देखील मागतली हाेती. याप्रकरणी पाेलिसांनी तीन आराेपींना पकडले आहे. अन्य फरार आराेपींचा शाेध सुरु आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.
परदेशी नागरिकांना लुटल्यानंतर त्यांना खालापूर टाेल नाक्याजवळ साेडण्यात आले हाेते. त्यानंतर ते पुन्हा मुंबई येथे गेले आणि सहारा पाेलिस ठाण्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ते काेठे गेले याबाबत माहिती मिळत नसल्याचे पाेलिस सुत्रांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील खालापूर पाेलिस ठाण्यातही या घटनेची नाेंद करण्यात आली आहे. भारतातील पाच आराेपींच्या संपर्कामध्ये लंडनमधून एक व्यक्ती संपर्कात हाेती. लंडनमधील ती व्यक्ती एजंट असल्याचे बाेलले जाते. त्यांनेच इराकी नागरिकांची माहिती भारतातील लुटारुंना दिल्याचे समाेर येत आहे.
26 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे परदेशी नागरिक उतरले. यावेळी विमानतळावर काही व्यक्ती त्यांच्या नावाचे बोर्ड घेवून उभे होते. बोर्ड पाहून परदेशी नागरिक त्यांच्या वाहनातून इच्छित स्थळी जाण्यास निघाले. त्यावेळी आपले अपहरण झाले आहे. याची त्यांना माहिती नव्हती. लुटारुंपैकी एकाने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत या परदेशी नागिरकाचे पासपोर्ट आणि मोबाईल काढून घेतले. अन्य चार जणांनी परदेशात त्याच्या नातेवाईकांकडे फोनद्वारे संपर्क साधत खंडणीची मागणी केली. खंडीची मागणी पूर्ण होईपर्यंत त्यांना गाडीमधून ठिकठिकाणी फिरवले. पैसे मिळत नाही याचा अंदाज आल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या लुटारुंनी या परदेशी नागरिकांना मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर साेडले. त्या आधी त्यांनी त्यांना अटक करण्याची धमकी देत पैसे, मोबाईल आणि बॅग असा सुमारे 90 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.खालापूर टोलनाका येथे पोलिस असल्याचे पाहील्याने लुटारुंचे धाबे दणाणले. त्यांनी पैस घेऊन मोबाईल आणि बॅग वाहनातच ठेवले आणि तेथून पळ काढला. पाेलिसांनी उरण-केगाव, पुणे आणि सातारा-मान येथून तीन आराेपींना अटक केली आहे.
भारतातील पाच आराेपींसाेबत लंडनमधून एक व्यक्ती संपर्कात हाेती. त्या व्यक्तीकडून सर्व माहिती मिळत असल्याने तीन इराकी पर्यटकांना ट्रप करणे साेपे गेले. पाेलिसांनी तीन आराेपींना पकडले आहे. अन्य लवकरच पाेलिसांच्या जाळ्यात सापडतील. - अशाेक दुधे (जिल्हा पोलीस अधिक्षक)