शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

कर्जाचे आमीष दाखवत अडीच लाखांना युवकाला 'चूना'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2021 3:45 PM

शहरात मागील काही दिवसांपासून कर्जप्रकरणांच्या मंजुरीचे आमीष दाखवून चोरट्यांकडून अनेकांना गंडा घातला जात आहे.

ठळक मुद्दे एका नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर २ लाख ३७ हजार ८४४ रुपयांना गंडा

नाशिक : वैयक्तिक कर्जपुरवठा करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत त्या कंपनीचा स्वत:ला अधिकारी भासवून कर्ज मंजुर करण्याचे आमीष दाखवत तोतया अधिकाऱ्याने एका युवकाला सुमारे अडीच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात मागील काही दिवसांपासून कर्जप्रकरणांच्या मंजुरीचे आमीष दाखवून चोरट्यांकडून अनेकांना गंडा घातला जात आहे. हे भामटे कर्जपुरवठा करणाऱ्या बजाज फायनान्ससारख्या कंपनीच्या नावाचा वापर करत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले. काही दिवसांपुर्वीच आर्टीलरी सेंटरमधील एका जवानाला अशाचप्रकारे सुमारे दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले होते.फिर्यादी ब्रिजेश परशुराम सिंग (२६, रा. टाकळीरोड) यांना १९ ते २३ जुलै दरम्यान संपर्क साधून त्याने बजाज फायनान्सद्वारे वैयक्तीक कर्ज देण्याचे आमीष दाखवले. सिंग यांचा विश्वास संपादन करण्यासाठी भामट्याने त्यांना बनावट कागदपत्रे सोशलमिडियाद्वारे पाठवली. तसेच कर्ज घेण्यासाठी वेगवेगळे शुल्क द्यावे लागेल असे सांगून भामट्याने वेळोवेळी त्यांच्याकडून २ लाख ३७ हजार ८४४ रुपयांना गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.मोठी रक्कम वसूल केल्यानंतरसुध्दा कर्जप्रकरण मंजुर झाले नाही आणि बँकेच्या खात्यामध्ये कुठल्याहीप्रकारची रक्कम येण्याऐवजी असलेली रक्कमही गेल्याची जेव्हा खात्री पटली तेव्हा सिंग यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात संशयित चोरट्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम