शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

अश्लील व्हाईस मेसेजनंतर गिफ्ट म्हणून पाठविली अंतर्वस्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 3:06 PM

३६ वर्षीय आरोपीला गोव्यातून बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देपीडित ३३ वर्षीय महिलेला १५ जून रोजी राहत्या घरी पोस्टाने एक पार्सल आले होते. पोलिसांनी टपाल खात्याकडे या महिलेला आलेल्या पार्सलबाबतची माहिती मागवली. आरोपीने महिलेला वास्को येथील टपाल कार्यालयासह मुंबईतील जीपीओ येथूही अंतर्वस्त्र पाठवल्याचे पोलीस तपासात उघड प्रदोष रामकृष्ण नाईक (३६) असं अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे. 

मुंबई -  चर्चगेट येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला अंतर्वस्त्र गिफ्ट म्हणून पाठवणाऱ्या ३६ वर्षीय आरोपीला गोव्यातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी भारतीय पुरातत्त्व विभागात नोकरी करत असून यापूर्वीही त्याने मेसेजवरून पीडित महिलेला अश्‍लील व्हाईस मेसेज पाठवला होते. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनीविनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदोष रामकृष्ण नाईक (३६) असं अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे. पीडित ३३ वर्षीय महिलेला १५ जून रोजी राहत्या घरी पोस्टाने एक पार्सल आले होते. त्यावर इंग्रजी भाषेमध्ये तुझ्यासाठी विशेष गिफ्ट पाठवले आहे. तीन पॅन्टीज फक्‍त तुझ्यासाठी, मला विश्‍वास आहे तुला आवडतील,प्लीज त्या घाल असा अश्‍लील संदेश लिहिला होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने पोस्टात चौकशी केली असता ते काळबादेवी येथून आल्याचे उघड झाले आहे. मनात लज्जा उत्पन्न झाल्यामुळे या महिलेने याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली. पोस्टाकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी प्रदोष रामकृष्ण नाईक (३६) याला गोव्यातील फोंडा परिसरातून अटक करण्यात आली. तपासात आरोपीचे नाव पुढे आल्यानंतर वर्षभरापासून महिलेला मेसेजवरून त्रास देणारा हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.नाईक याने या सर्व प्रकरणाची सुरूवात ऑक्‍टोबर २०१८ मध्ये केली होती. पीडित महिला मरिन ड्राईव्ह येथे कुत्र्याला फिरवण्यासाठी आणि मार्निंग वॉकसाठी आली होती. त्यावेळी एक व्यक्ती तिच्या मागेपुढे येरझऱ्या घालत होता. त्यावेळी त्याने कुत्र्याबाबत विचारत विचारत महिलेशी ओळख करून तिचे नाव विचारले होते. त्यानंतर महिलेच्या लॅंडलाईन दूरध्वनी करून आणि मोबाईलवरून व्हॉट्स अ‍ॅपवरून ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याने पाठवलेल्या फोटो व नावावरून मरिन ड्राईव्ह येथे महिलेमागे येरझऱ्या घालणाऱ्या तोच व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. आपण बीबीसीआयचा पहिल्या दर्जाचा पंच असल्याचा दावाही केला होता. महिलेने व्हॉट्‌स अ‍ॅपवर त्याला ब्लॉक केले. त्यानंतर तिने स्वतःचा मेसेंजर पाहिला असता आरोपीकडून अनेक व्हीडिओ कॉल आणि व्हाईस मेसेजही आले होते. या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने आरोपीचे सर्व संदेश सीडीवर साठवून ठेवले होते. त्यांनतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टपाल खात्याकडे या महिलेला आलेल्या पार्सलबाबतची माहिती मागवली. त्यावेळी तो गोव्यातील वास्को रेल्वे स्थानकाजवळील पोस्टातून पाठवण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आरोपीपर्यंत पोहोचला. आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोव्यातील वास्को येथील कामाच्या ठिकाणी गेलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीअंती त्याला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शनिवारी अटक केली. चौकशीत आरोपीने महिलेला वास्को येथील टपाल कार्यालयासह मुंबईतील जीपीओ येथूही अंतर्वस्त्र पाठवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

 

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकgoaगोवा