शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

ट्रकसह ७२ लाखांची दारू पळविली; तिघांना ५ दिवसांची पोलिस कोठडी

By राजकुमार जोंधळे | Published: May 17, 2024 11:14 PM

चाकूर न्यायालयात तिघांना हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लातूर : धर्माबाद (जि. नांदेड) येथून ७२ लाखांची विदेशी दारूचे बॉक्स घेऊन कोल्हापूरकडे निघालेला ट्रक चाकूर ते बोरगाव काळेदरम्यान चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. दरम्यान, यातील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जीपसह अटक केली. चाकूर न्यायालयात तिघांना हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी सांगितले, धर्माबाद येथून कोल्हापूरकडे निघालेल्या विदेशी दारूचा ट्रक चाकूर ते आष्टामोडदरम्यान जीप आडवी लावून थांबविला. यावेळी चार ते पाच जणांना ट्रकमध्ये घुसखोरी केली. चकूचा धाक दाखवून स्टिअरिंगवर ताबा मिळवला. त्यांच्यावर चादर टाकण्यात आली. हा ट्रक बार्शी महामार्गावरील बोरगाव काळे येथे आणण्यात आला.

ट्रकमधील चालकासह इतरांना खाली उतवण्यास सांगितले. महामार्गालगतच्या शेतात दोरखंड, शर्टने त्यांचे हातपाय बांधले. दारूसह तो ट्रक पळविला. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढला असता तुळजापूर-धाराशिव महामार्गावरील तामलवाडी नजीक १२ मे रोजी तो ट्रक रिकाम सापडला. यातील दारूचे बॉक्स दरोडेखोरांनी लंपास केले होते.

या टोळीतील चौघांना पांढऱ्या रंगाच्या जीपसह वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली आहे. यातील एकाला गुरुवारी तर दोघांना शुक्रवारी चाकूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तत्रय निकम करत आहेत.

ट्रकला जीपीएस यंत्रणा नसल्याने झाली अडचण...धर्माबाद येथील ट्रक मालकाने जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याने ट्रक शोधण्यात अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी मात्र या ट्रकचा माग काढत सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तामलवाडी गाठले. या परिसरात दारूचे बॉक्स लंपास करून रिकमा ट्रक थांबविण्यात आल्याचे समोर आले, तर दोन दिवसांनंतर विदेशी दारूसह चाैघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता...चाकूर-आष्टामोड मार्गावर पांढऱ्या रंगाची जीप ट्रकसमोर आडवी लावून दारूचा ट्रक पळविणाऱ्या टोळीतील दरोडेखोरांची संख्या सात ते आठ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यातील चैघांच्या मुसक्या आवळल्या असून, इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. त्यांनी इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का? याचीही माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :Arrestअटक