भीतीपोटी राहत होता जंगलात, 3 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलीस आले टेन्शनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 09:46 PM2022-03-11T21:46:15+5:302022-03-11T21:46:51+5:30
Deadbody Found : हा मृतदेह हिस्ट्रीशीटर चोरटा असल्याची ओळख पटली असून तो पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतात, जंगलात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रतलाम : जिल्ह्यात एका दिवसापूर्वी मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. तो मृतदेह तीन दिवसांपेक्षा जुना असल्याचे सांगण्यात आले. मृतदेहाचे जनावरांनी लचके तोडले होते, त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. पोलिसांना मृतदेह जिल्हा रुग्णालयात न्यावा लागला. यानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा मृतदेह हिस्ट्रीशीटर चोरटा असल्याची ओळख पटली असून तो पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतात, जंगलात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कुटुंबातील सदस्यांनी ओळखले
प्रत्यक्षात बुधवारी रोला गावाजवळ एक मृतदेह आढळून आला. ज्याला जनावरांनी खाल्लं होतं. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मृतदेह दशरथचा असून तो रोला गावातील रहिवासी असल्याचे आढळून आले. नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
पोलिसांच्या भीतीने कुटुंबापासून दूर
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर रोला गावातील मयत दशरथ याच्यावर प्राणघातक हल्ला, चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. काही प्रकरणांमध्ये त्यांनी शिक्षाही भोगली होती, मात्र काही प्रकरणे प्रलंबित होती. मृताची बहीण रेश्मा हिने सांगितले की, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. बराच काळ पोलिसांपासून वाचण्यासाठी तो कुटुंबापासून दूर शेतात किंवा इतर ठिकाणी राहत होता.
पीएम रिपोर्टवरून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल
एक दिवसापूर्वी सापडलेला गुंड दशरथचा मृतदेह ३ दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. रिंगनोडचे एसआय सत्येंद्र रघुवंशी यांनी सांगितले की, दशरथचा मृत्यू आत्महत्या की अपघात, याचे कारण स्पष्ट झाले नाही. आम्ही शवविच्छेदन केले आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.