लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेजारच्या घरातील चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या ५० वर्षीय वाहकाची विशेष पॉक्सो न्यायालयाने सुटका केली. आरोपी अल्पवयीन मुलीसमोर त्याच्या घरात टॉवेलवर वावरत होता, असा आरोप त्याच्यावर होता.
वाहक स्वत:च्याच घरात लैंगिक हेतूने टॉवेलवर वावरत नव्हता. आरोपी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याने कमरेला टॉवेल लावला होता. त्याने हे लैंगिक हेतूने केल्याचे दिसत नाही, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदविले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आणि तक्रारदार शेजारी राहतात आणि ही घटना २ मार्च २०१८ या दिवशी घडली. या दिवशी रंगपंचमी होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी दुपारी एक वाजता होळी खेळत होती आणि त्यावेळी आरोपीने तिला त्याच्या घरी नेले. मुलगी घरी परत न आल्याने पालक आरोपीच्या घरी तिला शोधण्यासाठी गेले. पालकांनी आरोपीच्या घरात डोकावून पाहिले तर तो घरात टॉवेलवर होता आणि मुलीला त्याच्या खासगी भागाजवळ नेत होता.
आरोपीच्या म्हणण्यानुसार, मुलगी त्याला अब्बा म्हणत असे आणि ते दोघेही एकत्र जेवत, तक्रारदार आणि आरोपीची पाणी जोडणी एकच असल्याने त्या दोघांत वाद होता. त्यामुळे तक्रारदाराने आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली हाेती.