ठाणे : प्राथमिक शिक्षकांची ठाणे-पालघर शिक्षक पतसंस्था ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कार्यरत आहे. या संस्थेच्या काही संचालकांनी जादा रकमेची बनावट वेतनाची स्लिप (पे-स्लिप) तयार करून त्याद्वारे लाखो रुपयांची उचल, म्हणजे कर्ज घेतल्याची गंभीर तक्रार या संस्थेच्या संचालकांनीच जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. मात्र, त्यावरील कारवाईस विलंब होत असल्यामुळे संबंधित संचालक आता विभागीय सहकार आयुक्तांकडे धाव घेण्याच्या प्रयत्नात आहे.सद्य:स्थितीत काही को-आॅप. बँकांच्या मनमानी कारभारामुळे दिवाळे निघ्+ााले आहे. त्या डबघाईला आल्यामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादून त्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. यात ठाणे व पालघर जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेमधील मनमानी कारभारांच्या लेखी तक्रारींसंबंधित संचालकांकडूनच उपनिबंधकाकडे केल्या जात आहेत. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्यास विलंब होत असल्यामुळे संचालकवर्गात तर्कवितर्क काढले जात आहे. एवढेच नव्हे तर विभागीय आयुक्तांचे दरवाजे ठोठावण्याच्या हालचालीदेखील त्यांनी सुरू केल्या आहेत.या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर सुमारे ६५ लाखांच्या मनमानी खर्चाच्या आरोपासह काही संचालकांनी वेतनातील रक्कम वाढवून बनावट पे-स्लिपवर १८ लाखांच्या जवळपास उचल किंवा कर्ज घेतल्याची तक्रार ११ संचालकांनी उपनिबंधकांकडे केली आहे. त्यावरील सुनावणी गांभीर्याने घेण्यासही विलंब होत असल्यामुळे संचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात सुनावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कर्जवाटपातील गैरव्यवहारांवर त्वरित सुनावणी व्हावी अशी मागणी संचालकांतून होत आहे. जेणेकरून दोषींवर ताबडतोब कारवाई होऊ शकेल. यासंदर्भात उपनिबंधक विशाल जाधव यांच्या संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते अन्य प्रकरणाच्या सुनावणीत असल्यामुळे बोलू शकले नाही.भ्रष्टाचाराबाबतही तक्रारीमुरबाड, नवी मुंबई, उल्हासनगर येथील शाखांसाठी खरेदी करण्यात आलेल्या वास्तंूमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाखाली उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे.त्यांचा निपटारा झालेला नाही. केवळ सुनावणीसाठी पुढच्या तारखा मिळत आहेत.
बनावट पे-स्लिपद्वारे कर्ज : शिक्षक पतसंस्थेतील कर्जवाटपात संचालकांनी केला घोटाळा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 1:53 AM