अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): कर्ज काढून देण्यासाठी महिलांची कागदपत्रे जमा करण्यात आली. त्यानंतर संबंधित कागदपत्राच्या आधारे विविध बँका आणि खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत कंझारा येथील दाम्पत्य पसार झाले. दरम्यान, वसुलीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर याप्रकरणी फसवणूक झाल्याचे समजताच, एका महिलेने ग्रामीण पोलीसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी दाम्पत्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत शाेभा दिनेश तायडे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, कंझारा येथील राजेंद्र त्र्यंबक घोगले आणि राजर्षी राजेंद्र घोगले यांनी विश्वास संपादन गावातील महिलांना कर्ज काढून देण्याचे आमीष दिले. प्रत्येकी चार हजार रूपयांचे कर्ज काढल्यानंतर कर्जाची परतफेड स्वत:च करणार असल्याची ग्वाही दिली. दोन्ही आरोपींच्या भूलथांपाना बळी पडून गावातील महिलांनी त्यांची आधारकार्ड, तसेच काही महत्वाचे दस्तवेज आरोपींना दिले. या कागदपत्रांचा दुरूपयोग करून आरोपींनी खामगाव शहरातील विविध नामांकित राष्ट्रीकृत तसेच खासगी फायनान्स कंपनीकडून तक्रारदार महिलांच्या नावावर विविध बँकाकडून एकूण २,३५,०००/-रुपये लोण घेऊन त्याबदल्यात फिर्यादस २३००० रुपये नगदी दिले. फिर्यादी घरी हजर असतांना वरिल नमूद विविध बँकेचे वसूली अधिकारी हे फीच्या घरी आले व तिला तिचे नावावर असलेल्या कर्जबाबत माहिती देऊन पैसे भरण्यास सांगितले. याप्रमाणें यातील आरोपींनी फिर्यादीची २,१२ ००० रूपयांची फसवणूक केली. तसेच नमूद आरोपींनी संगनमत करून गावातील इतर महिलांना विश्वासात घेऊन त्यांचे जवळुन कागदपत्रे घेतले. त्याच्या नावावर लोन घेऊन व त्यांना १० टक्के रक्कम देऊन उर्वरित लोनची रक्कम स्वतः हा घेऊन लोनच्या हप्त्याची रक्कम भरती नाही याचप्रमाणे त्यांची फसवणूक केली आहे. त्यानंतर कर्जाची रक्कम घेऊन आरोपी पसार झालेत. बँकांचा कर्जवसुलीसाठी ससेमिरा मागे लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या निदर्शनास आल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी उपरोक्त आरोपी िवरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरिक्षक सुरेश नाईकनवरे करीत आहेत.