पणजी - गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र असल्यामुळे अंमली पदार्थांचा व्यवहारही पर्यटनाचा साईड इफेक्ट म्हणून आला आहे. समानाची म्हणजे गोव्यात ड्रग्सचा व्यवहार होत असला तरी गोमंतकीय या व्यवहारात येण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. यंदाच्या वर्षात अंमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्या खाली गुन्हा नोंदविण्यात आलेल्यात एकही माणूस गोमंतकीय नाही. गोव्यात ड्रग्स व्यवहार करणा-यात ९० टकक्याहून अधिक लोक हे गोव्याबाहेरील असतात. मुख्य म्हणजे सर्वाधिक हे विदेशी असतात. २०१९ वर्षात जानेवारी ते आतापर्यंत एनडीपीएस कायद्याखाली एकाही गोमंतकीय नागरीकाला अटक करण्यात आली न सल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी विभागाचे अधिक्षक शोभीत सक्सेना यांनी दिली. एनडीपीएस कायद्यात प्रत्येक प्रकारच्या अंमली पदार्थाचे व्यावसायिक प्रमाण हे वेगवेगले निश्चीत करण्यात आलेले आहे. त्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडला तर त्यात व्यवहार करताना आढळलेल्या व्यक्तींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला जातो. अंमली पदार्थांचा व्यवहार करणा-यांतही गोमंतकियांची प्रमाण अत्यल्प आहे आणि प्रत्यक्ष अंमली पदार्थ सेवन करणा-यांचीही कमी आहे. अंमली पदार्थांचा व्यहार करणारे लोक हे येथील पर्यटकांना लक्ष्य करीत आहेत. अंमली पदार्थांचा व्यवहार करणारे विदेशी नागरीक आणि गोव्याबाहेरील परंतु देशी लोकही विदेशींनाच लक्ष्य करतात. विदेशी लोकांकडून कोकेन, एक्स्टेसी, एमडीएमए या सारखे अंमली पदार्थ अधिक प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत, तर ड्रग्स व्यवहारात असलेल्या देशी लोकांकडून गांजा अधिक प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. ड्रग्स व्यवहारात असलेले विदेशी नागरीक अधिक प्रमाणात हे नायजेरीयन आणि टांजानियाचे असतात. तसेच रशियन आणि युकेचे नागरीकही काही प्रमाणात सापडले आहेत. एकदा पकडल्यानंतर जामीनवर सुटल्यानंतर पुन्हा ड्रग्स व्यवहारात गुंतल्यामुळे पुन्हा अटक करण्यात आलेल्यात नायजेरीयाचे नागरिक सर्वाधिक आहेत.
ड्रग्स व्यावसायिक प्रमाणहेरॉइन २५० ग्रॅमओपियम २.५ किलोमोर्फाईन २५० ग्रॅमगांजा २० किलोचरस १ किलोकोका लिफ २ किलोकोकेन १०० ग्रॅमएम्फेटामाईन ५० ग्रॅमएलएसडी १०० ग्रॅम