नोएडा : उत्तर प्रदेशमध्ये दारु विक्रीला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमुळे राज्याचा महसूल थांबल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिन्याच्या कालखंडानंतर दारु पिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कदायाक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशच्य़ा नोएडातील सेक्टर १०५ मध्ये एक व्यक्तीचा गुरुवारी रात्री संशयितरित्या मृत्यू झाला. सुरुवातीच्या तपासामध्ये समोर आले की, त्याचा दारु पिल्याने मृत्यू झाला. जास्त दारू पिल्याने त्याला जीव गमवावा लागला. लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्याने हा व्यक्ती कामावर गेला होता. पोलिसांनी पोस्टमार्टेमझाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
मृताचे वय ५७ आहे. सेक्टर १०५ मध्ये ते भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून कामावर जात नव्हते. काम संपल्यानंतर त्यांनी दारु प्राशन केली आणि घरी येऊन झोपी गेले. काही वेळाने घरातील सदस्याचे त्यांच्याकडे लक्ष गेले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र काहीच हालचाल न झाल्याने अखेर पोलिसांना कळविण्यात आले. तेथील पोलीस निरीक्षक शैलेश सिंह यांच्यानुसार प्रकरणाचा तपास सुरु असून पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्य़ानंतरच सारे समोर येणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट
चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र
कर्मचाऱ्यांनो! पुढची १० वर्षे घरूनच काम करा, काही हरकत नाही; मार्क झकरबर्गची घोषणा