मुंबई - मुंबईत लॉकडाऊनदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. लॉकडाऊनमध्ये रुम दिला नाही म्हणून हॉटेलमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहे. नुकताच कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपीने हा प्रकार केल्याची माहिती जे. जे. मार्ग पोलिसांनी दिली आहे.मोहम्मद अजीज अबू सालेम असं अटक आरोपीचं नाव आहे.
आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल दरोडा व हत्येच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली असून त्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्याला त्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. तसेच त्याच्याविरोधात खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. आरोपी गँगस्टर इजाज लकडावालाचा एकेकाळचा विश्वासू साथीदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन टाकी परिसरातील खांडीया स्ट्रीट येथे इंदौर लॉजिंग बोर्डींगआहे. ७ मे रोजी तीन व्यक्ती या हॉटेलमध्ये येऊन राहण्यासाठी रुमची विचारणा करू लागले. त्यावेळी हॉटेल मालक अब्दुल्ला करीम यांनी कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी नियमानुसार तुम्हाला रुम देता येणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी मालक अब्दुल यांच्यासोबत आरोपींनी वाद घालण्यास सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अब्दुलला मारहाण केली आणि तेथून पळ काढला. त्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा ते त्रिकुट आले आणि पिशवीमध्ये काही स्फोटकजन्य पदार्थ होते. त्याला माचिसने आग लावून आरोपींनी पळ काढला. ज्वलनशील पदार्थामुळे हॉटेलच्या लाकडी दरवाज्याला आग लागली. हॉटेलचे व्यवस्थापक रजनीश मिश्रा याने त्यावेळी प्रसंगावधान राखून अग्नी विरोधक यंत्रणेच्या मदतीने आग विझवली.
याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांकडे हॉटेल मालकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून एका आरोपीला अटक केली आहे.
...म्हणून पत्नी आणि ३ मुलांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या; सुुसाईड नोटमधून खुलासा
Coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण; कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात हलवलं