मीरारोड - कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर केली असता गुन्ह्यांचे प्रमाण देखील खुपच कमी झाले होते. मात्र, लॉकडाऊन शिथील होऊन लोकांची वर्दळ वाढु लागताच आता चोरटे देखील सरसावले आहेत. मीरारोडमध्ये पोलीस असल्याची बतावणी करुन वृध्दांचे दागिने लुबाडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. बुधवारी घडलेल्या घटनेत तब्बल 2 लाख 26 हजारांचे दागीने लुबाडण्यात आले.शांती नगर सेक्टर 6 मधील सी - 18 मध्ये राहणाऱ्या पुष्पाबेन शहा (70) या बुधवारी पावणे सहाच्या सुमारास जैन मंदिरात पुजेसाठी गेल्या. पूजा करुन घरी परत येत असताना तोंडावर मास्क घातलेला इसम आला व पोलीसवाला बोलावतो असे सांगितले. त्यामागे उभ्या असलेल्या इसमाकडे गेल्या असता त्याने, आपण पोलीस असून रात्री येथे एका महिलेला चाकू मारुन गळ्यातले दागिने नेल्याचे आणि तुम्ही दागिने काढुन बॅगेत ठेवा सांगितले.
पुष्पाबेन यांनी सोन्याच्या बांडय़ा, दोन सोन्याच्या चैन, दोन सोन्याच्या अंगठय़ा असे 2 लाख 26 हजार रुपयांचे दागिने काढले व दुसऱ्या इसमाकडे कागदात ठेवण्यास दिले. ते कागदात ठेवल्याचे सांगून पुडी पुष्पाबेन यांच्या बॅगेत ठेवली. घराजवळ पोहचल्या असता मुलगा हितेश भेटला व त्यास पोलीसवाला भेटल्याचे सांगितले. कागदाची पुडी उघडुन पाहिली असता त्यात दागिने नव्हते. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या आधी क्विन्स पार्कमधील साई पार्कमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी सालियन या 60 वर्षाच्या वृध्द महिलेस देखील पोलीस असल्याचे सांगून लुबाडण्यात आले. सकाळी साडे सातच्या सुमारास त्या मुख्य रस्त्यावर चालत जात असताना एकाने पोलीस असल्याचे सांगून पुढे एका महिलेचा खून करुन तिचे दागिने काढून नेल्याचे सांगितले. लक्ष्मी यांनी त्यांच्या हातातील बांगड्या व गळ्यातील चैन असे 1 लाख 87 हजार रुपयांचे दागिने काढुन दिले. ते बॅगेत ठेवतो सांगून हातचलाखीने लुबाडुन नेले. याचा गुन्हा देखील नया नगर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
खासगी नर्सिंग होममध्ये सशस्त्र टोळीचा दरोडा; चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात
कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असून धार्मिक स्थळे बंद आहेत. तसेच नाहक बाहेर पडु नये म्हणुन लोकांना आवाहन केले गेले आहे. त्यातच या पुर्वी देखील चेनस्नॅचिंग, पोलीस असल्याचे वा अन्य कारण सांगुन दागिने लुबाडण्याचे प्रकार घडले असल्याने पोलिसांकडून नेहमीच खबरदारी बाळगा, शक्यतो दागिने घालणे टाळा असे नेहमीच सांगितले जाते. तरीदेखील लोकं खबरदारी घेत नसल्याने गुन्हेगारांचे फावत असल्याचे जागरुक नागरिकांनी सांगितले.