मुंबई - जगात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाच या लॉकडाऊनचा फज्जा उडवित हुल्लडबाजी करणाऱ्या एका खाजगी गाडीवर रुग्णवाहीकेचा सायरन लावत गो कोरोना... गो कोरोना... असं ओरडत फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, मुंबईपोलिसांनी या हुल्लडबाज व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. अय्यतुल्ला कुल्लरजाडेअसे अटक आरोपीचे नाव आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असून याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. लॉकडाऊनचा आदेश जे बेजबाबदार धाब्यावर बसवित आहेत, त्यांना पोलिसांनी खाक्या दाखवण्यास सुरुवात केली आहे. माटुंगा येथील प्रसिद्ध् रेस्टॉरंटचा मालक असलेला अय्यतुला कुल्लरजाडे यांनी स्वतःच्या खाजगी गाडीवर रुग्णवाहिकेचा सायरन लावला. त्यानंतर तो गो कोरोना.. गो कोरोना... म्हणत मुंबईच्या रस्त्यावर फिरु लागला.
इतक्यावरच न थांबता त्याने याचा व्हिडीओ बनवित फेसबकवर अपलोड केला. मात्र, सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असलेल्या मुंबई पोलिसांना याची माहिती मिळताच, त्यानी यांचा तपास करीत अय्यरातुला याला ताब्यात घेतले. यापकरणी गुन्हा दाखल करत याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.