शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

लंडनच्या मित्राने नागपूरच्या तरुणीला फसवले : १६.३१ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 7:39 PM

पारडीतील एका तरुणीसोबत लंडनच्या युवकाने ऑनलाईन मैत्री केली. मैत्रीत तिला डायमंड आणि विदेशी करन्सीसह गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवून पार्सल सोडवण्याच्या नावावर १६ लाख ३१ हजार रुपयाने फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देडायमंड व विदेशी करन्सी पाठवण्याचे आमिष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडीतील एका तरुणीसोबत लंडनच्या युवकाने ऑनलाईन मैत्री केली. मैत्रीत तिला डायमंड आणि विदेशी करन्सीसह गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवून पार्सल सोडवण्याच्या नावावर १६ लाख ३१ हजार रुपयाने फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.वैशाली शेंडे (३५) रा. पारडी, रेणुकानगर असे फिर्यादी युवतीचे नाव आहे. वैशालीने मॅट्रमोनी साईटवर लग्नासाठी आपली माहिती नोंदवली होती. या साईटचा हवाला देत ८ जुलै २०१९ रोजी जुळे राजकुमार नावाच्या युवकाने त्यांना मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला. जुळे राजकुमारने तो लंडनला राहत असल्याचे सांगत वैशालीसोबत मैत्री केली. यानंतर वैशालीसाठी लंडनवरून शूज, गोल्ड आणि डायमंड गिफ्टसह विदेशी करन्सी पाठविल्याचे आमिष दाखविले. यानंतर काही दिवसांनी एका महिलेने स्वत:ला दिल्ली कस्टम विभागातील अधिकारी असल्याचे सांगत वैशालीला तिचे गिफ्ट आल्याचे सांगितले. परंतु हे महागडे गिफ्ट कस्टममधून क्लिअर करण्यासाठी विविध चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ३१ हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यात जमा करायला लावली. ही रक्कम जमा केल्यानंतरही वैशालीला कुठलेही गिफ्ट मिळाले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वैशालीने पारडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पारडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.व्हीओआयपी नंबरचा वापरआरोपीने वैशालीला फोन करण्यासाठी व्हाईस ओव्हर इंटरनेट कॉल (व्हीओआयपी) तंत्रज्ञानाचा वापर केला. याला इंटरनेट कॉलसुद्धा म्हटले जाते. सायबर गुन्हेगार या तंत्रज्ञानाचा वापर करताहेत. यात आरोपीचा पत्ता लावणे कठीण असते. आरोपी इंटरनेटवर स्वत:ची बोगस आयडी टाकून नंबर प्राप्त करतात आणि त्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात.पीडित परिवार पोलीस विभागाशी संबंधितवैशालीचे वडील शहर पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या रकमेतूनच वैशालीने आरोपीला रक्कम दिली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर वैशालीवरच आई व घराची जबाबदारी आहे. फसवणुकीनंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीLondonलंडनnagpurनागपूर