Robbery Of Jewellery Showing Toy Gun: चोरीच्या अनेक विचित्र घटना समोर येतात. चोर पकडलेही जातात, पण अनेकदा त्यांचे प्रकार विचित्र असतात. टॉय गनच्या सहाय्याने चोरट्याने चोरी केल्याची घटना नेमकी अशीच समोर आली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे सुमारे दहा लाखांचे दागिनेही त्याने लुटले, मात्र शेवटी तो पकडला गेला.
वास्तविक ही घटना मुंबईतील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी येथील नालासोपारा येथे एका कॅब चालकाने ही चोरी केली. या घटनेपूर्वी त्यानं त्यासाठी एक प्लॅन तयार केला होता. काही दिवसांपूर्वी तो या दुकानाजवळ एका प्रवाशाला सोडण्यासाठी गेला होता, त्याचवेळी त्याने येथे चोरी करण्याचा निर्णय घेतला होता, असे सांगितले जात आहे. दरम्यान, त्याने खेळण्यांचे दुकानही पाहिले होते.
खेळण्याच्या बंदुकीवर लुटलंरिपोर्ट्सनुसार, त्याचे नाव कमलेश आहे आणि ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली होती, ज्याचा पूर्णपणे आता खुलासा झाला आहे. घटनेपूर्वी तो टॉय गन घेण्यासाठी गेला होता आणि नंतर दागिन्यांच्या दुकानात गेला होता. तेथे त्याने आपली ओळख ग्राहक म्हणून करून दिली आणि नंतर दुकानाचे मालक सुरेश कुमार यांना चांदीचे दागिने दाखवण्यास सांगितले.
दरम्यान, त्याने असेही सांगितले की त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोन्याचे कानातले घ्यायचे होते आणि तो नंतर परत येईल. त्यानंतर तो तेथून निघून बॅग घेऊन परत आला. बॅगेत भरलेले दागिने मिळताच त्याने त्याच बनावट बंदुकीच्या जोरावर लूट केली. दुकानदाराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो पळून गेल्याचे सांगण्यात आले.
पण त्या कॅब ड्रायव्हर चोराने अशी चूक केली की चोरी करताना तो दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्या आधारे पोलिसांनी त्याला पकडले. दागिन्यांच्या दुकानातून लुटण्याचे तीन गुन्हे इतर पोलीस ठाण्यात यापूर्वीच चालकावर दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.