शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

शेअरमार्केटमध्ये बुडाला अन् घरफोडीचा ‘ट्रॅक’ धरला; आठवडाभरात गुन्ह्याचा छडा

By अझहर शेख | Published: July 19, 2022 6:25 PM

Crime News : गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने नाशिक रोडमधील दोघा संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नाशिक : शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करत, आर्थिक कमाई करताना झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एका उच्चशिक्षिताने आपल्या दुसऱ्या मित्राला सोबत घेत, चक्क घरफोडी करण्याचा ‘ट्रॅक’ धरल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने नाशिक रोडमधील दोघा संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी आठवडाभरापूर्वी जयभवानी रोडवरील एका बंगल्यात घरफोडी करत २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिने, रोकड लांबविली होती.

‘ईश्वर’ बंगला बंद असताना, चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. तिजोरीतील सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिन्यांसह रोकड घेऊन चोरटे चारचाकी मोटारीतून फरार झाले होते. या प्रकरणी संजय ईश्वरलाल बोरा यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या नियंत्रणाखाली गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाकडून केला जात होता. हवालदार प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून वाघ यांनी त्वरित उपनिरीक्षक पोपट कारवाळ, शंकर काळे, गुलाब सोनार, प्रकाश काळे, देवकिसन गायकर आदींच्या पथकाला सज्ज करत मोटवानी रोड गाठले.

गोपनीय माहितीप्रमाणे, संशयास्पद ‘रिट्स’ कार आली असता, पोलीस वाहन त्या कारपुढे आणून पथकाने कार रोखली. यावेळी कारमध्ये असलेल्या दोघांनी रोहन संजय भोळे (३५, रा.विद्यानगर, ना.रोड), ऋषिकेश मधुकर काळे (२६,रा.गंधर्वनगरी, ना.रोड) अशी ओळख सांगितली. दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पथकाने त्यांना संशयावरून ताब्यात घेतले. संशयित रोहन हा शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. त्यामध्ये त्याला तोटा झाला. त्यानंतर, तो सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी गुन्हेगारीकडे वळाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा संशयितांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली.

दोन कार, दुचाकी जप्तसंशयित रोहन व ऋषिकेश चांगल्या सुशिक्षित कुटुंबातील आहेत. १० जुलै रोजी त्यांनी ईश्वर बंगल्यात घरफोडी केली. त्यापूर्वी मे महिन्यात जयभवानी रोडवरील अजून एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यातील कार (एम.एच.०३ बीई०८४८), मारुती स्विफ्ट (एम.एच१५ जीएल ९१४२) ॲक्सेस दुचाकी (एम.एच१५ ईबी३०३३) दोन मोबाइल जप्त केले आहेत.

घरफोडी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर क्राइम सीन उभा केला गेला. यावेळी ‘गेट ॲनालिसिस’द्वारे या दोघांची देहबोली, चालण्याची ढब आणि बंगल्यात घरफोडी करताना, सीसीटीव्हीत कैद झालेले चोरट्यांची हालचाल पडताळून बघितली गेली. ती एकसमान आढळून आली. या दोघा संशयितांनी जीममध्ये जाऊन कमाविलेल्या बलवान शरीराचा चुकीच्या पद्धतीने गैरकामासाठी वापर केला, हे दुर्दैव.- जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक