"डेटिंगवर खर्च केलेले ५०००० रुपये दे"; ब्रेकअपनंतरचा प्रेयसीसोबतचा वाद थेट उच्च न्यायालयात
By हेमंत बावकर | Published: October 17, 2020 03:17 PM2020-10-17T15:17:11+5:302020-10-17T15:18:06+5:30
Breakup ke Baad: प्रकरण सुरतच्या युगुलाचे आहे. 27 वर्षांचा तरुण आणि 21 वर्षांची तरुणी यांची दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोन्ही मेहसानाच्या एकाच गावातील राहणारे आहेत. तसेच एकाच समाजाचे आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. याची सुरुवात एप्रिल 2018 मध्ये झाली होती. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते.
सूरत : मोफत भोजनासारखी कोणतीही गोष्ट असत नाही, असे म्हटले जाते. तसाच प्रकार गुजरातच्या मेहसाणामध्ये घडला आहे. या तरुणानुसार मोफत कॉफी किंवा भेटवस्तू सारखी कोणतीही गोष्ट नसते, असे त्याचे म्हणणे आहे. या तरुणाचा प्रेमभंग झाला. यामुळे या तरुणाने प्रेयसीकडून तिच्यासाठी डेटिंग आणि अन्य ठिकाणी फिरायला जाणे यावर केलेला खर्च मागण्यास सुरुवात केली. जेव्हा प्रेमिकेने त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावर त्रासलेल्या प्रेयसीने त्याच्याविरोधात जबरस्ती वसुली करण्याचा गुन्हा दाखल केला. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे.
प्रकरण सुरतच्या युगुलाचे आहे. 27 वर्षांचा तरुण आणि 21 वर्षांची तरुणी यांची दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोन्ही मेहसानाच्या एकाच गावातील राहणारे आहेत. तसेच एकाच समाजाचे आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. याची सुरुवात एप्रिल 2018 मध्ये झाली होती. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते.
एका खास कार्यक्रमात तरुणाने त्याच्या प्रेयसीला सोबत येण्याचा आग्रह केला होता. मात्र, तिने परिक्षा असल्याचे सांगत नकार दिला होता. यामुळे नाराज झालेल्या प्रियकराने तिच्यासोबत वाद घालत प्रेमसंबंध संपविले. यानंतर तरुणीने मार्च महिन्यातच पोलिसांकडे धाव घेतली होती व प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला होता.
तक्रारीमध्ये आरोप लावण्यात आला आहे की, प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर तिच्याकडे 50000 रुपये परत करण्याची मागणी सुरु केली. तर तरुणाने हे पैसे तिला फिरविण्यासाठी, डेटवर, जेवण-नाष्ट्यामध्ये खर्च झाले. प्रेयसीने विद्यार्थीनी असल्याने तिच्याकडे तेवढे पैसे नसल्याचे सांगत हे पैसे देण्यास नकार दिला होता. यावर त्या प्रियकराने तिला फोन करून शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणाने त्याचा नंबर ब्लॉक केला.
काही दिवसांनंतर तिला एक धमकीचा मेसेज आला. जर पैसे परत केले नाहीत तर तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार असल्याचे त्यात म्हटले होते. यानंतर काही दिवस त्या तरुणीने फोन बंद ठेवला. यानंतर त्या प्रियकराने तिच्याकडे 60000 रुपये मागितले.
अखेर या त्रासाल कंटाळून प्रेयसी पोलीस ठाण्यात गेली आणि गुन्हा नोंदविला. आता या तरुणाने हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये त्याने प्रेयसीने लावलेल्या आरोपांना फेटाळले आहे.