शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:09 AM

धावत्या ट्रकमध्ये मोबाईल फेकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न : बेलतरोडी पोलीसांची कारवाई

योगेश पांडे

नागपूर : ऑगस्ट महिन्यात ‘मिसिंग’ झालेल्या एका तरुणीची हत्या झाल्याची बाब अखेर समोर आली आहे. तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली व निर्जन स्थळी मृतदेह पुरून त्याने चक्क सिमेंटने ‘फ्लोअरिंग’देखील केले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने हैदराबादकडे जाणाऱ्या धावत्या ट्रकमध्ये तिचा मोबाईल फेकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या सखोल चौकशीनंतर हा प्रकार समोर आला आहे. आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे.अजय वानखेडे (३३, न्यू कैलासनगर) असे आरोपीचे नाव आहे. तर ज्योस्त्ना (३२) असे मृतक तरुणीचे नाव आहे.

ज्योत्स्ना ही टेलिकॉलर म्हणून नोकरीला होती. तिचा घटस्फोट झाला होता व दुसऱ्या लग्नासाठी तिने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. यातूनच तिची आरोपी अजयसोबत ओळख झाली होती. अजयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्न करण्याचे वचन दिले. मात्र प्रत्यक्षात त्याने १९ मे मध्ये दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. ही बाब त्याने ज्योत्स्नापासून लपवून ठेवली होती. २८ ऑगस्ट रोजी ज्योत्स्ना बेसा येथे तिच्या मैत्रिणीकडे थांबण्यासाठी गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी फोन लावून मैत्रिणीला विचारणा केली. ज्योत्स्ना रात्री आठ वाजता फोनवर बोलण्यासाठी जवळील बगिच्यात गेली व तेथून परत आलीच नाही असे तिच्या मैत्रिणीने सांगितले. तिच्या नातेवाईकांनी १७ सप्टेंबरपर्यंत तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र ती न सापडल्यामुळे त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

याचा तपास करत असताना पोलिसांना तिच्या मोबाईलमुळे ‘ब्रेक थ्रू’ मिळाला. तिचा मोबाईल आरोपीने हैदराबादला गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकला होता. तो ट्रक काही दिवसांनी नागपुरात परत आला व ट्रकचालकाला त्यात मोबाईल दिसला. त्याने त्यातील सीम काढून वेगळे सीम टाकले. तेव्हा पोलिसांना मोबाईल फोन ट्रेस झाला. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी केली असता त्यांना मोबाईलबाबत माहिती मिळाली.

थंड डोक्याने केली हत्या

आरोपी अजयने ज्योत्स्नाला भेटण्यासाठी बोलविले व तिला कारमधून वारंगा येथील निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे त्याने तिची हत्या केली. त्यानंतर तिचे पूर्ण कपडे काढून जवळील निर्जन स्थळी तिचा मृतदेह मेणकापड व प्लास्टिकमध्ये गुंडाळून पुरला. तेथे त्याने निवांतपणे सिमेंटने फ्लोअरिंगदेखील केले. यानंतर तिचे कपडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. तरुणीचा मोबाईल फोन सापडल्यावर सीडीआर काढला असता त्यात पोलिसांना ती गायब होण्याच्या वेळी अजयसोबत बोलत असल्याची बाब लक्षात आली. त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो तेथून पुण्याला गेला. त्याने अटकपूर्व जामिनासाठीदेखील अर्ज केला होता. मात्र तो फेटाळल्या गेला. त्यानंतर चौकशीदरम्यान त्याने पोलिसांची दिशाभूल केली. मात्र अखेर त्याने तिचा मृतदेह पुरलेली जागा दाखविली.

गाडी धुतल्यामुळे आली शंका

पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. त्याची गाडी धुतल्याची बाब समोर आली. गाडी आतूनदेखील धुतली होती. त्याने याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची ज्योत्स्नासोबत त्याच्या लग्नानंतर मेडिकलमध्ये भेट झाली होती. तिने त्याच्या आईला संपूर्ण प्रकार सांगितला होता व त्याची पोलिसांत तक्रार करेन असा इशारा दिला होता. यामुळे घाबरून अजयने तिचा जीव घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी