उत्तर प्रदेशच्या मोहनलालगंजे भाजपाचे खासदार कौशल किशोर यांचा मुलावर गोळी झाडण्याच्या केसममध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. खासदाराचा मुलगा आयुषने पत्नी आणि मेहुण्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. आयुष म्हणाला की त्याच्या पत्नीने त्याच्यावर हल्ला करवला आणि तो लवकरच सरेंडर करणार आहे.
आयुषने एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यात त्याने सांगितले की, कशाप्रकारे त्याचं अंकितासोबत लग्न झालं. आयुष म्हणाला की, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मी अंकितासोबत लग्न केलं. काही महिने सगळं काही ठीक होतं. पण नंतर अनेक गुपितं समोर येऊ लागली. अंकिताने आधीही एका व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. त्यांचा घटस्फोटही झाला नव्हता.
आयुष म्हणाला की, 'याबाबत जेव्हा मी अंकिताला विचारले तर माझं आणि तिचं भांडणं सुरू झालं. अंकिता मला धमकावत होती. मी ट्रॉमा सेंटरमध्ये भरती होतो. तिने मला कॉल केला की, मी तुझ्या वडिलांच्या विरोधकांशी जाऊन मिळेल. ते मला ऑफर देत आहेत. मी तुला आणि तुझ्या वडिलांना उद्ध्वस्त करेन'.
आयुषचा आरोप आहे की, 'अनेकदा अंकिता मला मारझोड केली होती. ज्याने निशाण माझ्या हातावर आहेत. जेव्हा तिने मला मारलं तेव्हा ती म्हणाली होती की, मला परत तुझं तोंड दाखवू नको. मी म्हणालो ठीक आहे. नंतर दोन दिवसांनी तिचा फोन आला. मी घरी तिची वाट पाहत होतो. त्या दिवशी अंकिता बहराइचला गेली. तिथे ती कुणालातरी भेटणार होती. आणि त्याच दिवशी ही गोळीबाराची घटना घडली.
कौशल किशोर यांचा मुलगा आयुषने सांगितले की, 'गोळीबारानंतर मी लखनौमधून गेलो आहे, तीन दिवस नशेत राहिलो. अजूनही माझी मानसिक स्थिती ठीक नाही. तिने दोन-तीन लग्ने केली आहेत. माझी फसवणूक झाली आहेच. मी लखनौला येणार आहे. सरेंडर करणार आहे. जी शिक्षा मिळेल ती मान्य असेल. पण तिच्याबाबतही तपास व्हावा.
दरम्यान, २ मार्च २०२१ रोजी रात्री अडीच वाजता भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुषवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. गोळी लागल्याने आयुषला मामूली इजा झाली होती. त्याला नंतर ट्रॉमा सेंटरला शिफ्ट केलं. काही वेळाने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले तर त्यांना आयुषची हालचाल संशयास्पद वाटली. पोलिसांनी आयुषच्या घराची झडती घेतली. तेव्हा ज्या बंदुकीने त्याच्यावर हल्ला झाला ती बंदुक त्याच्या घरातून ताब्यात घेतली. त्यानंतर आयुषच्या मेहुण्याने सांगितले की, त्याने त्याच्या भाओजीच्या सांगण्यावरूनच त्यांच्यावर गोळी झाडली होती. जेणेकरून दुसऱ्या कुणाला फसवता येईल.