"मॅडमची तब्येत बिघडली आहे, माझ्या घरी जेवण पाठव!"; ऑडिओ व्हायरल होताच पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 10:07 PM
Audio Viral : व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये असे स्पष्टपणे ऐकू येत आहे की, रेस्टॉरंटचे मॅनेजर पैसे देणार का? यावर चौकी प्रभारी सांगतात की, मी जेवण माझ्या घरासाठी मागवत आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका इन्स्पेक्टरचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. कौशांबी पोलिस स्टेशनमध्ये तैनात इन्स्पेक्टर विनोद कुमार हे हॉटेल मॅनेजरकडून घरपोच जेवण मोफत घेत असल्याचं या ऑडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. यामध्ये विनोद कुमार म्हणत आहेत की, जेवणाचे बिल अड्जस्ट करा, हे अन्न माझ्या घरी जात आहे. बुधवारी हा ऑडिओ व्हायरल होताच विनोद कुमार यांना निलंबित करण्यात आले. याप्रकरणी निरीक्षकांची विभागीय चौकशीही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये असे स्पष्टपणे ऐकू येत आहे की, रेस्टॉरंटचे मॅनेजर पैसे देणार का? यावर चौकी प्रभारी सांगतात की, मी जेवण माझ्या घरासाठी मागवत आहे. इतर कोणाला खायला नाही. चौकी प्रभारी सांगतात की, मॅडमची तब्येत बिघडली असून नातेवाईक घरी आले आहेत. रेस्टॉरंट मॅनेजर म्हणतात की, थोडी सूट घ्या! पण पेमेंट पूर्ण करा किंवा अर्धे पेमेंट करा. यावर चौकी प्रभारी सांगतात की, मी माझ्या घरी जेवण पाठवत आहे, बाकी म्हणाल तर मी रेस्टॉरंटमध्ये येऊन २-३ दिवस काम करेन.