शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

प्रेयसीच्या नवऱ्याला बिझनेस पार्टनर बनवलं, 10 लाखांची सुपारी देऊन मारून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 8:58 PM

Extra Marital Affair : ४३ वर्षीय शैलेश प्रजापतीची पत्नी स्वाती आणि प्रियकर नितीन प्रजापतीने त्याची हत्या केली.

गुजरातमधील अहमदाबादमधील वस्त्राल भागात २४ जून रोजी झालेल्या एका रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याबाबत धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रस्ता अपघात नव्हता. तर विचारपूर्वक कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. ४३ वर्षीय शैलेश प्रजापतीची पत्नी स्वाती आणि प्रियकर नितीन प्रजापतीने त्याची हत्या केली.वास्तविक स्वाती आणि नितीन यांचे विवाहबाह्य संबंध होते. स्वाती आधीच विवाहित होती आणि शैलेश तिचा नवरा होता. पती शैलेशमुळे स्वातीला नितीनला भेटायला खूप त्रास व्हायचा. अशा परिस्थितीत दोघांनीही एक प्लॅन बनवला की, नितीन शैलेशला आपला बिझनेस पार्टनर बनवतो. जेणेकरून तो कधीही आरामात, बिनदिक्कत त्याच्या घरी जाऊ शकेल. लवकरच शैलेश आणि नितीन बिझनेस पार्टनर बनले. या बहाण्याने नितीन वारंवार त्यांच्या घरी येऊ लागला.पतीला पत्नीच्या अफेअरची माहिती कळलीशैलेशला एक दिवस दोघांच्या अफेअरची माहिती मिळाली. यावरून शैलेश आणि स्वाती यांच्यात मारामारी सुरू झाली. स्वाती देखील याच कारणामुळे नितीनला भेटू शकली नाही. नितीन आणि स्वातीने शैलेशचा काटा काढ्याचा कट आखला. मग दोघेही आरामात भेटू शकतील. दोघांनी यासीन नावाच्या सुपारी किलरशी संपर्क साधला. त्याला 10 लाख रुपयाची सुपारी दिली. 24 जून रोजी शैलेश मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला असताना मागून येणाऱ्या कारने त्याला धडक दिल्याने वाटेत त्याचा मृत्यू झाला.सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांना संशय आलापोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता त्यांना घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्याला नीट पाहिल्यावर हा अपघात नसून शैलेशला जाणीवपूर्वक मारण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. शैलेश रस्त्याच्या कडेला शांतपणे चालत होता. त्यानंतर मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टेम्पोने मुद्दाम गाडी शैलेशच्या दिशेने वळवली. त्यानंतर त्याला धडक देऊन तो पळून गेला.पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिलीपोलिसांनी शैलेशची पत्नी स्वातीची कसोशीने चौकशी केली असता तिने काही वेळातच गुन्ह्याची कबुली दिली. तिने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी स्वाती, नितीन आणि सुपारी घेणारा यासीनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वाती आणि नितीनला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी सुपारी घेणारा यासीन हा फरार आहे. त्याचा शोध सुरूच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसArrestअटक