शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

विवाहित प्रेयसीसोबतच्या शरिरसंबंधाचा व्हिडीओ बनविला, फेसबूक फ्रेण्डवर बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:13 PM

ब्लॅकमेलिंग सुरू - फेसबूक फ्रेण्डवर बलात्काराचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देफेसबुकवरील मैत्रीला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना आपली पर्सनल माहिती आणि मोबाईल नंबरही एक्स्चेंज केले. नंतर ते सलग संपर्कात राहू लागले.

नागपूर - शरिरसंबंध प्रस्थापित करताना व्हिडीओ तयार करून त्या आधारे विवाहितेला ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यश नेमादे (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तक्रार करणारी महिला गड्डीगोदाम भागात राहते. ती विवाहित असून आरोपी अविवाहित आहे. तिची आणि आरोपी नेमादेची गेल्या वर्षी फेसबूकवर ओळख झाली होती.

फेसबुकवरील मैत्रीला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना आपली पर्सनल माहिती आणि मोबाईल नंबरही एक्स्चेंज केले. नंतर ते सलग संपर्कात राहू लागले. भेटीगाठीही वाढल्या. एकांतवासात भेटी होऊ लागल्याने त्यांची जवळीक जास्तच वाढली. यातून त्यांनी एक दिवस सीताबर्डीतील एका लॉजवर शरिरसंबंध प्रस्थापित केले. यावेळी नेमादेने त्याच्या मोबाईलमध्ये शरिरसंबंधाचा व्हिडीओ तयार केला. दुसऱ्यांदा त्याने अश्लिल फोटो काढले. दरम्यान, अलिकडे त्यांच्या संबंधातील गोडवा संपला. त्यामुळे एकेमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. तो तिला अश्लिल फोटो आणि व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करणे सुरू केल्याने ती हादरली. तिने काही दिवस विचारविमर्श केल्यानंतर शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. नेमादेने बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात नोंदवली. प्रकरण तपासल्यानंतर ठाणेदार अतुल सबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर यांनी आरोपी नेमादेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस