मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि मुख्य शहर असलेल्या जबलपूरमध्ये आर्थिक गुन्हे शाखाने (EOW) बुधवारी छापे टाकले. यावेळी राजधानी भोपाळमध्ये एका क्लर्कच्या घरातून तब्बल 85 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याच बरोबर जबलपूरमध्येही एका सरकारी अभियंत्याकडे उत्पन्नापेक्षाही 200 पट अधिक संपत्ती असल्याचा खुलासा झाला आहे.
आर्थिक गुन्हे शाखाच्या चमूने भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असलेला क्लर्क हिरो केसवानीच्या घरावर छापा टाकला. यावेळी आरोपी क्लर्कने नाट्यमय पद्धतीने विष (फिनाइल) घेतले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला तत्काळ हमीदिया रुग्णालयात नेले. येथून सायंकाळी उशिरा डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. EOWच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता, घरातून सुमारे 85 लाख रुपयांची रोख जप्त केली आहे.
सोने आणि महागड्या सूट्सचा शौकिन -केसवानी सोने आणि महागड्या सूट्सचा शौकिन आहे. तो अधिकाऱ्यांप्रमाणे मोठ-मोठ्या पार्ट्यांमध्येही सहभागी व्हायचा. एवढेच नाही, तर तो पार्ट्यांना जातांना नेहमीच वेगवेगळ्या महागड्या कार नेत असत. मिळालेल्या माहितीनुसार, केसवानीला वैद्यकीय शिक्षण विभागातूनही निलंबित करण्यात आले आहे. आता त्याची विभागीय चौकशीही सुरू झाली आहे. केसवानी हा गेल्या 20 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत आहेत. तसेच, त्यांचे कुटुंब EOW च्या तपासात सहकार्य करत नसल्याचेही समजते.
केसवानीने 4 हजार रुपये पगारापासून सुरू केली होती नोकरी -ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अधिकांश संपत्तती पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे. हीरो केसवानीने 4 हजार रुपये पगारापासून नोकरी सुरू केली होती. आता त्याची सॅलरी 50 हजार रुपये एढी आहे. EOW च्या कारवाईत आतापर्यंत दोन बँक खाते समोर आले आहेत. बैरागड येथी त्याच्या घराची किंमत सुमारे दीड कोटी रुपये एवढी आहे. त्याच्या घरातून चारचाकी वाहन, तसेच एक स्कूटी जप्त करण्यात आली आहे. त्याच्या घरच्यांच्या नावे बँकेत लोखो रुपये जमा आहेत. त्याचा एक मुलगा प्रायव्हेट नोकरी करतो, तर दुसऱ्या मुलाला नुकतीच क्लर्कची सरकारी नौकरी मिळाली आहे आणि त्याची पत्नी गृहिणी आहे.
याशिवाय हीरोने बैरागडच्या जवळपास नुकत्याच विकसित झालेल्या भागांत फ्लॅट आणि प्लॉट खरेदी केले आहेत. याची कागदपत्रेही त्याच्या घरातून जप्त करण्यात आली आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.