VIDEO : मुझे छोड दो, छोड दो...! कारमध्ये तरुणीला बंधक बनवण्याचा प्रयत्न; जीवाच्या आकांतानं ओरडत तिनं कारमधून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 08:09 PM2022-11-05T20:09:32+5:302022-11-05T20:10:35+5:30

सांगण्यात येते, की एक तरुण संबंधित तरुणीचा हात पकडून तिला कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होता. कारमध्ये अगदी निर्जन ठिकाणी तरुणीसोबत जबरदस्ती केली जात होती.

madhya pradesh attempted hostage-taking of a young girl in a car; she jumped out of the car while Screaming for her life | VIDEO : मुझे छोड दो, छोड दो...! कारमध्ये तरुणीला बंधक बनवण्याचा प्रयत्न; जीवाच्या आकांतानं ओरडत तिनं कारमधून मारली उडी

VIDEO : मुझे छोड दो, छोड दो...! कारमध्ये तरुणीला बंधक बनवण्याचा प्रयत्न; जीवाच्या आकांतानं ओरडत तिनं कारमधून मारली उडी

Next

मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीला चालत्या कारमध्ये बंधक बनविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या तरुणीला कारमध्ये बंधक बनवून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, संबंधित तरुणी जीवाच्या आकांताने सोडण्याची विनंती करताना आणि कारमधून बाहेर पडताना दिसत आहे.

सांगण्यात येते, की एक तरुण संबंधित तरुणीचा हात पकडून तिला कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होता. कारमध्ये अगदी निर्जन ठिकाणी तरुणीसोबत जबरदस्ती केली जात होती. याच वेळी येथून जाणाऱ्या दोन दुचाकी स्वारांनी मागून या कारचा आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ इंदूरमधील एका पॉश भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या घटनेसंदर्भात अद्याप पोलीस ठाण्यात कसल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओ आणि गाडी नंबरच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत. आरटीओ रेकॉर्डनुसार, कार मालकाने 1 वर्षापूर्वीच ही कार विकली असल्याचे समजते. 

महत्वाचे म्हणजे, पोलीस स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत तपास करू शकतात. व्हिडीओ ज्या परिसरातील असल्याचे बोलले जात आहे, त्या परिसरातील सीसीटीव्हीचीही तपासणी होऊ शकते.

Web Title: madhya pradesh attempted hostage-taking of a young girl in a car; she jumped out of the car while Screaming for her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.