ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, पाहुण्यांना कोंडून दिला चोप अन् नवरदेवाला फेकलं रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 03:42 PM2022-02-23T15:42:44+5:302022-02-23T15:45:34+5:30

Madhya Pradesh : नवरदेवाला मंडपातून ओढत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, बत्ताशे फेकण्यावरून वाद पेटला होता.

Madhya Pradesh : Bride refused marriage Processionists beaten groom thrown on the road | ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, पाहुण्यांना कोंडून दिला चोप अन् नवरदेवाला फेकलं रस्त्यावर

ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, पाहुण्यांना कोंडून दिला चोप अन् नवरदेवाला फेकलं रस्त्यावर

Next

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रीवामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे नवरीकडील लोकांनी वरातील आलेल्या पाहुण्यांची चांगलीच धुलाई केली. इतकंच नाही तर नवरदेवाला मंडपातून उचलून रस्त्यावर नेऊन फेकलं. नवरी म्हणाली की, नवरदेवाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ज्यामुळे तिने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. नवरदेवाला मंडपातून ओढत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, बत्ताशे फेकण्यावरून वाद पेटला होता. हा वाद इतका वाढला की,  दोन्ही पक्षात हाणामारी सुरू झाली.

परंपरेनुसार नवरदेव आला तेव्हा काही लोक नवरी पक्षाकडील महिलांवर बत्ताशे फेकत होते. आरोप आहे की, काही वराती हे महिलांवर निशाणा साधून बत्ताशे मारत होते. यावर नवरीकडील काही लोकांनी आक्षेप घेतला. तेव्हा कसातरी हा वाद मिटला. सांगितलं जात आहे की, हार घालताना वरातील आलेले काही तरूण नवरदेवाला स्पर्श करत होते. हे बघून नवरीकडील लोकांनी काठ्या काढल्या आणि नवरदेवासोबत इतरांनाही कोंडून चोप दिला.

एएसपी शिवकुमार यांनी सांगितलं की, लग्नाच्या रिवाजादरम्यान नवरी-नवरदेवाच्या पक्षात वाद झाला होता. नवरदेवाच्या वडिलांनी त्यांना बंदी बनवल्याचा आरोप लावला. तेच नवरीकडील लोकांनी सांगितलं की, ज्या मुलासोबत लग्न होणार होतं त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. हार घालताना नवरदेव अजब वागत होता. हे लोक त्याची मानसिक स्थिती लपवून लग्न लावून देत होते. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वाद शांत केला. नवरीने लग्नास नकार दिल्यावर वरातील नवरीविनाच परतावं लागलं.
 

Web Title: Madhya Pradesh : Bride refused marriage Processionists beaten groom thrown on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.