महिलांना प्रायव्हेट पार्ट दाखवत फिरायचा; गावकरी सांगून सांगून वैतागले, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 12:03 PM2022-08-08T12:03:17+5:302022-08-08T12:03:34+5:30

पोलिसांनी रविवारी सांगितले की, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Madhya Pradesh Crime News: Man showing private parts to womens of village; villagers poured petrol and set it on fire | महिलांना प्रायव्हेट पार्ट दाखवत फिरायचा; गावकरी सांगून सांगून वैतागले, अखेर...

महिलांना प्रायव्हेट पार्ट दाखवत फिरायचा; गावकरी सांगून सांगून वैतागले, अखेर...

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या बैतुलमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. जिल्ह्यातील एक व्यक्ती महिलांना प्रायव्हेट पार्ट दाखवत फिरायचा. लोकांनी समजावून पण तो ऐकत नव्हता. यामुळे वैतागलेल्या लोकांनी त्याच्या अंतर्वस्त्रात पेट्रोल टाकून आग लावून दिल्याची घटना घडली आहे. 

पोलिसांनी रविवारी सांगितले की, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर उपचार सुरु असून त्याचा प्रायव्हेट पार्ट २० टक्के जळाला आहे. काजली गावातील ही घटना आहे. गावातील महिलांसमोर हा दीपचंद नावाचा व्यक्ती नग्न होत होता. त्यांना त्रास द्यायचा, यावरून त्याला अनेकदा इशारा देण्यात आला होता. 

बीजादेही पोलीस ठाण्याचे अधिकारी बीएल उइके यांनी या घटनेची माहिती दिली आहे. अनेकदा बजावूनही तो ऐकत नव्हता. शनिवारी देखील त्याने महिलांसमोर कपडे काढून लज्जास्पद वर्तन केले. घटनेच्या दिवशीदेखील त्याला सुदेश कावडे आणि कृष्णा उईके यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांचे ऐकले नाही. 

दीपचंदच्या या वर्तनामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी याची माहिती गावकऱ्यांना दिला. यानंतर तिथे आलेल्या सुदेश आणि कृष्णा यांनी त्याच्या अंतर्वस्त्रावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. या दोघांविरोधात कलम 324 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीला बैतुलच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात देखील महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Madhya Pradesh Crime News: Man showing private parts to womens of village; villagers poured petrol and set it on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.