शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

पत्नीचे दीराशी प्रेम संबंध; अडसर ठरणाऱ्या पतीचे शीर धडापासून वेगळे केले, दीड वर्षानंतर झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 4:25 PM

Madhya Pradesh Crime: पतीचा मृतदेह दीड वर्षे घरातच ठेवला. या गुन्ह्यात दीरासह सासऱ्याने मदत केली.

Madhya Pradesh Crime: प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेने तुमचाही थरकाप उडेल. दीरासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने अतिशय क्रुर पद्धतीने काटा काढला. विशेष म्हणजे या गुन्ह्यात महिलेला दीर आणि सासऱ्याने मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील उमरी गावात ही थरकाप उडवणारी घटना घडली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, महिलेने दीर आणि काका सासऱ्याच्या मदतीने पतीला विष देऊन ठार केले आणि नंतर पतीचे शीर धडापासून वेगळे केले. यानंतर दीड वर्षे पतीचा मृतदेह घरातच भुश्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. दीड वर्षानंतर पतीचा सांगाडा जंगलात फेकून दिला. इथेच महिलेचा गुन्हा उघडकीस आला. 

नेमकं काय घडलं?जंगलात सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि पतीच्या हत्येप्रकरणी महिलेसह 4 आरोपींना ताब्यात घेतले. सध्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. 40 वर्षीय रामसुशील पाल यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांनी बिटोल उर्फ रंजना पाल नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर रंजनाचे दीर गुलाब पालसोबत प्रेमसुख जुळले.

याची माहिती लागताच रामसुशील आणि रंजना, यांच्यात भांडणे सुरू झाली. यानंतर रंजना आणि गुलाबने रामसुशीलची हत्या करण्याची योजना आखली. रामसुशीलची हत्या केल्यानंतर, त्याची संपत्ती हडपण्याची योजना होती. यात रामसुशीलची पत्नी रंजना आणि भाऊ गुलाबने, दुसरा भाऊ अंजनी पाल आणि काका रामपती पालसह, इतर दोघांना सामील केले. अखेर दीड वर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस