'तुझ्यासाठी एक काय, माझे शंभर जन्म...', पत्नीने विश्वासघात केल्यावर पतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 01:31 PM2022-04-21T13:31:00+5:302022-04-21T13:31:24+5:30
Madhya Pradesh : या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'जानू, हे तुझ्यासाठी. मी ग्वाल्हेरला आलो केवळ तुला घेण्यासाठी. मला फार आधीपासून माहीत होतं की, तू संजयसोबत बोलते.
Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी त्याच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट सापडली आहे. ही सुसाइड नोट त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने लिहिली आहे. यात त्याने लिहिलं की, त्याला वाटलं त्याचं प्रेम पत्नीला बदलेल, पण तिने ऐकलं नाही आणि निघून गेली. तिने तिची आई आणि बहीण मालतीचं ऐकलं. पण एकदाही माझ्या डोळ्यांकडे पाहिलं नाही. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, त्यांना एक फोन आला होता की, खुडा वस्तीत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी केली. यादरम्यान समजलं की, गळफास घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आकाश शाक्य होतं. त्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली.
या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'जानू, हे तुझ्यासाठी. मी ग्वाल्हेरला आलो केवळ तुला घेण्यासाठी. मला फार आधीपासून माहीत होतं की, तू संजयसोबत बोलते. पण मी विचार केला की, माझ्या प्रेमाने तुझ्यात बदल होईल. पण तू ऐकलं नाही आणि निघून गेली. तू तुझी आई आणि बहिणीचं ऐकून परत येण्यास नकार दिला. पण एकदा माझ्या डोळ्यांकडे पाहिलं असतं, तुला त्यात तुझ्यासाठी अश्रू दिसले असते'.
सुसाइड नोटमध्ये त्याने पुढे लिहिलं की, 'सगळे लोक काहीबाही बोलत होते. मला त्यांची काळजी नव्हती. पण तू सुद्धा विसरली. माझ्यासोबत तू असं केलं. आता असं दुसऱ्या कुणासोबतही करू नको. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणी नव्हतं आणि येणारही नाही. मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आणि मरतानाही तूच माझ्या मनात होतीस. मी तुला दुसऱ्या कुणासोबतही बघू शकत नाही. त्यामुळे मी हे पाउल उचललं आहे. माझी आठवण कधी काढू नको आणि तुझ्या आयुष्यात नेहमी आनंदी रहा. तुझ्यासाठी मी माझा एक काय शंभर जीव कुर्बान करेन. या घटनेशी मकान मालक आणि इतर कुणाचा काही संबंध नाहीये. आई मला माफ कर. आकाश शाक्य The END'.
मीडिया रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीची पत्नी त्याला सोडून माहेरी ग्वाल्हेरला गेली होती. मृत्यूच्या एक दिवसआधीच तो तिला परत आणण्यासाठी ग्वाल्हेरला गेला होता. पण पत्नी त्याच्यासोबत आली नाही. यामुळे त्याच्या मनाला धक्का बसला आणि यामुळेच त्याने हे धक्कादायक पाउल उचललं. ज्या घरात त्याने गळफास घेतला ते भाड्याचं घर आहे. या घरात तो चार दिवसांआधीच राहण्यासाठी आला होता.