भोपाळ - मध्यप्रदेशात एका भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्याची, ऑनलाइन दारू खरेदी करताना 34 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. लोकेश कुमार जांगिड (35) असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सध्या भोपाळमध्ये कार्यरत आहेत. (Madhya Pradesh IAS officer duped while trying to buy liquor online)
लोकेश कुमार जांगिड हे 11 जुलैला ऑनलाइन दारू खरेदी करण्यासाठी सर्च करत होते. यावेळी त्यांना एक व्हॉट्स अॅप नंबर मिळाला. लोकेश यांनी या नंबरवर संपर्क साधला. यानंतर त्यांना एक कॉल आला आणि फोन करणाऱ्या वक्यक्तीने, आपण दारूच्या दुकानावरील कर्मचारी आहोत असे सांगितले. तसेच त्यांना जी दारू हवी आहे, त्यासाठी यूपीआयच्या माध्यमाने अॅडव्हॉन्स 8,500 रुपए द्यावे लागतील, असे सांगितले.
यानंतर, लोकेश यांनी पैसे ट्रान्सफर केले. मात्र, फोन करणाऱ्याने, आपल्याला अद्याप पैसे मिळाले नाही, रिव्हर्स होऊन जातील, पुन्हा पेमेंट करा, असे सांगितले. यानंतर लोकेश कुमार यांनी पुन्हा 8,500 रुपयांचे पेमेंट केले. पण, यावेळीही त्याने पैसे मिळाले नसल्याचे सांगितले आणि त्याने पेमेंटसाठी एक UPI QR कोड लोकेश यांना पाठवला. हा कोड स्कॅन करताच लोकेश कुमार यांच्या खात्यातून 17,000 रुपये कटले. यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे समजले.
नंतर लोकेश यांनी क्राइम ब्रान्चमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आरोपीला ट्रॅक करत अटक केली. पोलीस आणखी दोन लोकांच्या शोधात आहेत. ज्या लोकांसाठी हा काम करत होता.