दगडानं ठेचून खून करायचा 'सायको किलर', ३ दिवसात दोघांची हत्या; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:31 PM2022-02-04T13:31:37+5:302022-02-04T13:32:58+5:30

आरोपीनं दगडानं ठेचून दोघांचा खून केला होता. वीडी दिली नाही किंवा पैसे दिले नाहीत अशा शुल्लक कारणामुळे या माथेफिरूनं दोघांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार

madhya pradesh katni psycho killer stone pelting murder | दगडानं ठेचून खून करायचा 'सायको किलर', ३ दिवसात दोघांची हत्या; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

दगडानं ठेचून खून करायचा 'सायको किलर', ३ दिवसात दोघांची हत्या; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

भोपाळ

मध्य प्रदेशच्या कटनी पोलिसांनी एका माथेफिरू खुन्याला अटक केली आहे. आरोपीनं दगडानं ठेचून दोघांचा खून केला होता. वीडी दिली नाही किंवा पैसे दिले नाहीत अशा शुल्लक कारणामुळे या माथेफिरूनं दोघांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात दगड घालून तो घटनास्थळावरुन पळ काढायाचा अखेर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन अटक केली आहे. 

कटनी पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार कटनीच्या माधव नगर आणि कुठला ठाणे हद्दीतील परिसरात दगडानं ठेचून दोघांची हत्या केली होती. यातील पहिली हत्या माधवनगर ठाणे हद्दीतील पिपरौंध गावात २८ जानेवारी रोजी झाली होती. तर पन्ना मोड चक्की घाट येथील रहिवासी चंद्रशेखर निषाद या व्यक्ती ३०-३१ जानेवारीच्या दरम्यान रात्री उशिरा इंद्रानगर स्थित सरकारी निवास खोली क्रमांक ३८ मध्ये दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. 

एसपी सुनील जैन यांनी सांगितलं की, दोन्ही हत्या डोक्यात दगड घालून करण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही फुजेट आणि इतर तपासातून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. अखेर पोलिसांनी दोन्ही हत्यांचा आरोपी कैलाश उर्फ झोला चौधरी याला अटक केली आहे. 

आरोपी कैलाश याच्यावर याआधी देखील दगडानं ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे आणि आरोपी नुकतंच काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. आरोपीनं दोन्ही हत्यांची कबुली दिली आहे. एक हत्या त्यानं पैसे दिले नाही म्हणून तर दुसरी हत्या चिलम न दिल्यानं केल्याचं चौकशीत समोर आलं आहे. 

Web Title: madhya pradesh katni psycho killer stone pelting murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.