धक्कादायक! मित्राकडून डॉक्टर महिलेवर बलात्कार, व्हिडीओ तयार करून उकळले दीड लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 10:09 AM2021-07-16T10:09:06+5:302021-07-16T10:18:26+5:30
Crime News : यासंदर्भात अधिक माहिती देताना भोपाळच्या पिपलानी पोलीस ठाण्याचे चैनसिंह रघुवंशी यांनी सांगितले की, बुधवारी 24 वर्षीय एमबीबीएस डॉक्टर महिलाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका महिला डॉक्टरने आपल्या मित्राविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला आहे. मित्राने आधी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले, त्यानंतर याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैसेही काढून घेतले, असा या डॉक्टर महिलेचा आरोप आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना भोपाळच्या पिपलानी पोलीस ठाण्याचे चैनसिंह रघुवंशी यांनी सांगितले की, बुधवारी 24 वर्षीय एमबीबीएस डॉक्टर महिलाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या मित्राने एमपी नगर आणि पिपलानी भागातील हॉटेलमध्ये तिच्यासोबत बलात्कार केला. यावेळी त्याने व्हिडीओ सुद्धा तयार केला. यानंतर हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने जवळपास दीड लाख रुपयेही या महिलेकडून घेतले. यानंतरही आरोपीने महिलेचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची दोन वर्षांपूर्वी आरोपी युवकासोबत मैत्री झाली होती. दोघेही मैत्रीनंतर बरेच दिवस एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये आरोपीने महिलेला एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले आणि त्याठिकाणी तिच्यासोबत बलात्कार केला आणि व्हिडीओ तयार केला. यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून जवळपास दीड लाख रुपये घेतले.
पीडित महिलेने केलेल्या आरोपाच्या आधारे आरोपीच्या बँक अकाऊंट डिटेल्स तपासले जात आहेत. टीआयच्या म्हणण्यानुसार आरोपी युवक इंदूरचा रहिवासी आहे. सध्या आरोपीविरोधात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीतून पैसे काढल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल करता येऊ शकतात.