भोपाळ : मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटमधील खुलाशाने अनेक नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल असणाऱ्या या प्रकरणाशी संबंधीत 4000 फाईल तपास यंत्रणांना मिळाल्या आहेत. आता तर या प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे.
हनी ट्रॅप प्रकरणी पाच आरोपींसोबत अटक करण्यात आलेल्या 18 वर्षीय आरोपी मोनिका यादव हिने सरकारी साक्षीदार बनण्यास तयारी दर्शविली आहे. या प्रकरणात मोनिका यादव मुख्य साक्षीदार असणार आहे. त्यामुळे लवकरच या मोठ्या ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल प्रकरणी नवीन खुलासे येण्याची शक्यता आहे.
मोनिकाच्या वडिलांनी मानवी तस्करी प्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मोनिका सरकारी साक्षीदार बनण्यास तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. इंदोर महानगरपालिकेचे अभियंता हरभजन सिंह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोनिकाशिवाय आरती दयाल, श्वेता स्वप्नील जैन, श्वेता विजय जैन, बरखा सोनी आणि ड्राव्हर ओमप्रकाश याला अटक केली होती. अभियंत्याने आरोप लावला होता की, एका आरोपी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करत आपत्तीजनक व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओच्या आधारावर तिच्याकडून तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात येत आहे.
मोनिकाला बनविले 'मोहरा'पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, ही गँग श्वेता जैन चालविते. मोनिका सरकारी साक्षीदार म्हणून तयार झाल्यास श्वेता जैन कशाप्रकारे या प्रकारे हे रॅकेट चालवत होत्या, ते समोर येईल. मोनिकाला मोहरा बनवून आरोपींनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे.
चार तास चौकशीमध्य प्रदेश सरकारकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीने इंदोरमध्ये जाऊन मोनिकाची चौकशी सुरु केली आहे. बुधवारी जवळपास चार तास मोनिकाची चौकशी करण्यात आली. सुत्रांनी सांगितले की, आता मोनिका आणि तिचे वडील यांना संरक्षण देण्यात येणार आहे.
डार्ड डिस्कच्या चौकशीत एसआयटीभोपाळमध्ये आपोरी आरती दयाल हिच्या घरी जाऊन पुरावे गोळ्या करण्यासाठी एसआयटी बुधवारी रात्री उशिरा इंदोहून रवाना झाली आहे. मोनिकाच्या चौकशीदरम्यान हनी ट्रॅप प्रकरणात आरती संदर्भात एसआयटीला माहिती मिळाली आहे. यात तिने हार्ड डिस्कचा सुद्धा उल्लेख केला आहे. या हार्ड डिक्समध्ये अनेक व्हिडीओ आहेत.
चौकशीदरम्यान असे समोर आले...1) आरोपींना अनेक एस्कॉर्ट सर्व्हिस पोर्टल्सवर स्वत:चा तपशील दिला आहे. अनेक मोबाईल अॅप्सवर सुद्धा त्यांनी आपल्याविषयी माहिती दिली होती.2) क्लाइंट्ससोबत आरोपींनी आपली प्रोफाइल्स शेअर केली आहे. एवढेच नाही, तर गोवा, मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आरोपींचे ये-जा होते.3) आरोपी मुख्यत: मोठ्या घरांतील लोकांना आपल्या जाळ्यात अडविण्याचा प्रयत्न करत होते. खासकरुन श्रीमंत आणि लग्न झालेल्या लोकांना फसवून ब्लॅकमेल केले जात होते. 4) हे सर्व आरोपी एक दिवसासाठी 10 ते 40 हजारपर्यंत चार्ज घेत होते आणि महागड्या हॉटेलमध्ये राहत होते.