Mahalakshmi Murder Case : बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्या प्रकरणी मुख्य संशयित मुक्ती रंजन रे याच्याबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. मुक्ती रंजनच्या भावाने मोठा खुलासा केला आहे. मुक्ती रंजन याने त्या तरुणीचा मृतदेह लटकवण्याचा प्लॅन केला होता. दरम्यान, एक दिवसापूर्वी मुक्ती याने आत्महत्या केली. २१ सप्टेंबर रोजी, महालक्ष्मी या सेल्सवुमनचा मृतदेह तिच्या बेंगळुरू येथील घरात सापडला होता, मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते.
चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..."
मुक्ती रंजन याचा भाऊ सत्या याने याबाबत मोठा खुलासा केला आहे. सत्या म्हणाला की, मुक्ती याने २-३ महिन्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन केला होता. सत्या हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. 'मी बेरहामपूरमध्ये राहतो आणि शिकतो, माझा भाऊ तिथे आला आणि मला सगळं सांगितलं. महिलेची घरातच हत्या केल्यानंतर मृतदेह लटकवून आत्महत्या केल्याचे दाखवण्याचा कट रचला होता, असंही त्याने सांगितले.
'ज्यावेळी मुक्ती रंजन याचा प्लॅन अयशस्वी झाला, तेव्हा त्याने शरीराचे तुकडे केले आणि शरीराचे अवयव फ्रीजमध्ये ठेवले," सत्याचा दावा आहे की तरुणीने मुक्ती रंजन याची फसवणूक केली होती आणि ती तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. दुकानात काम करत होते, असंही सत्या याने सांगितले.
'भावाने सांगितले की ती महिला त्याच्याकडे पैसे मागत होती. तसेच ती त्याचा छळ करत आहे. नुकतेच हे दोघे केरळला गेले होते, तिथे त्यांच्यात भांडण झाले होते. यानंतर महिलेने पोलिसांना सांगितले की, मुक्ती यानेच अपहरण केले आहे. पोलिसांनी मुक्ती रंजन याला मारहाण करून नंतर सोडून दिले. तरुणीच्या गैरवर्तणुकीमुळे आणि वारंवार दागिने आणि पैसे मागितल्याने मुक्ती रंजन याला तिच्यापासून वेगळ व्हायचे होते, असा दावाही सत्या याने केला आहे.
तीन महिने त्यांच्यात भांडण सुरू होते, यानंतर मुक्ती रंजन याने तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह छताला लटण्याचा त्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसला. रात्री त्याने मृतदेहाचे तुकडे करून ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. तो मृतदेहाची विल्हेवाट तीन महिन्यानंतर लावणार होता, अशी माहिती मुक्ती रंजन याच्या भावाने दिली.