शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

Terror module in Mumbai: दहशतवादी कट: मुंबईतून सातवा संशयित ताब्यात; एटीएसच्या कारवाईने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 9:24 AM

Terror module in Mumbai: जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले.

महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. झाकीर असे या व्यक्तीचे नाव असून दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांसोबत त्याचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. (A joint team of Maharashtra ATS and Mumbai Police Crime Branch has taken a person into custody from Jogeshwari area of the city in connection with the terror module busted by Delhi Police earlier this week: Maharashtra ATS)

जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दिल्लीच्या स्पेशल सेलने जानची चौकशी केली, त्यानंतर महाराष्ट्र एटीएसला याची माहिती देण्यात आली होती. त्याला त्याच्या घरातूनच उचलण्यात आले. 

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठ्या दहशतवादी कटाचा उलगडा केला. सणासुदीच्या काळात हे दहशतवादी भारतात हल्ला करणार होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमला गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली होती. वेगवेगळ्या राज्यांतून 6 लोकांना अटक करण्यात आली होती. यापैकी दोघे पाकिस्तानहून ट्रेनिंग घेऊन आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ अनीस यासाठी पैसे पुरवत होता. पाकिस्तानची आयएसआय या लोकांना ट्रेनिंग देत होती. त्यांना अल कायदा, अंडरवर्ल्ड आणि आयएसआयएसची मदत मिळत होती. अनीस या हल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे देत असल्याचे समोर आले आहे. आयएसआयएस या दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवित होता. 

टॅग्स :terroristदहशतवादीAnti Terrorist SquadएटीएसMumbai policeमुंबई पोलीस