शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

महाराष्ट्र पोलीस दल अधिक भक्कम करु - सुबोध जयस्वाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 8:25 PM

मुंबई - देशपातळीवर महाराष्ट्र पोलीस दलाचा वेगळा लौकिक आहे. ही परंपरा साजेशी ठेवताना राज्य पोलीस दल सर्व अर्थाने अधिक भक्कम, ...

ठळक मुद्दे मावळते प्रमुख दत्ता पडसलगीकर यांच्याकहून त्यांनी साडेतीनच्या सुमारास पदभार स्विकारला. मुंबई पोलीस आयुक्तालयातील आठ महिन्याच्या कामाबद्दल आपण समाधानी आहोत.सुरक्षा व पारदर्शी कारभाराबाबत राबविलेले त्याठिकाणी राबविलेले उपाय आवश्यकतेप्रमाणे राज्यभरात राबविले जातील. पूर्वीच्या चांगल्या योजना , उपक्रम यापुढेही कायम ठेवल्या जातील.

मुंबई - देशपातळीवर महाराष्ट्र पोलीस दलाचा वेगळा लौकिक आहे. ही परंपरा साजेशी ठेवताना राज्य पोलीस दल सर्व अर्थाने अधिक भक्कम, शक्तीशाली करण्यावर आपला भर असेल, असे मनोगत राज्याचे नुतन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी व्यक्त केले. मावळते प्रमुख दत्ता पडसलगीकर यांच्याकहून त्यांनी साडेतीनच्या सुमारास पदभार स्विकारला. त्यानंतर पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले,‘ राज्यातील प्रत्येक पोलीस घटकाशी उत्तम समन्वय ठेवून त्याठिकाणची कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. शेजारी राष्ट्रबरोबर तणावग्रस्त परिस्थितीमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम केली जाईल. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी व घटक प्रमुखांशी बोलून माहिती घेण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातील आठ महिन्याच्या कामाबद्दल आपण समाधानी आहोत. सुरक्षा व पारदर्शी कारभाराबाबत राबविलेले त्याठिकाणी राबविलेले उपाय आवश्यकतेप्रमाणे राज्यभरात राबविले जातील. पूर्वीच्या चांगल्या योजना , उपक्रम यापुढेही कायम ठेवल्या जातील.

कोण आहेत सुबोध जयस्वाल?सुबोध जयस्वाल हे मुळचे बिहारचे असून १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना २००६मधील मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते होते. त्याचप्रमाणे १९९३च्या तेलगी मुंद्राक घोटाळ्याच्या तपासासाठी स्थापलेल्या विशेष पथकाचे ते प्रमुख होते. त्यांनी या खटल्यामध्ये माजी पोलीस आयुक्त रणजीत शर्मा यांना अटक केली होती. न्यायालयाने मात्र त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्ता केली. जायस्वाल यांनी यांनी मुंबईत मध्य विभागाचे अतिरिक्त अप्पर आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. २६ जून २००८ पासून ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होते. त्यामध्ये रॉसह विविध तपास यंत्रणामध्ये काम पाहिले असून त्यानंतर केंद्रीय सचिवालयात कार्यरत होते. गेल्यावर्षी ३० जूनपासून मुंबईच्या आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र