सावंतवाडी : गांजा विक्रीचे रॅकेट संपूर्ण जिल्हयात पसरले असून सावंतवाडीतील बाॅबी च्या चौकशीत कणकवली येथील संकेत ऊर्फ सनी महेद्रेकर यांचे नाव पुढे आल्यानंतर कुडाळ पोलीसांनी त्याचा शोध घेत होते अनेक ठिकाणी छापेमारी ही केली होती मात्र तो सापडत नव्हता पण शुक्रवारी रात्री तो कुडाळच्या दिशेने येणार असल्याच्या माहितीच्या आधारे पणदूर नजीक गाडी आडवी घालत फिल्मी स्टाईल ताब्यात घेत त्याच्याकडून 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हा आरोपी जिल्हयात गांजा पुरवण्याचे काम करत होता.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी सुरूवातीला चौघांना ताब्यात घेतले होते. यातील मुख्य सुत्रधार बॉबी उर्फ फैैजल बेग याच्या कडे पोलीसांना तीन किलो गांजा आढळून आला होता त्याने सावंतवाडीतील आपल्या घरात ठेवला होता.त्यामुळे या रॅकेट मध्ये अनेक जण असल्याचा संशय असल्याने पोलीसांकडून बाॅबी ची कसून चौकशी करण्यात आली होती.त्यात सकेंत ऊर्फ सनी यांचे नाव पुढे येत होते.त्याच्या शोधासाठी कुडाळ पोलीसांनी अनेक ठिकाणी छापेमारी ही केली होती.पण तो गांजा प्रकरण उघडकीस आल्यानंतर भुमिगत झाला होता.अखेर शुक्रवारी रात्री च्या सुमारास संकेत महेद्रेकर हा कणकवली हून कुडाळ च्या दिशेने येणार असल्याचे समजताच कुडाळ पोलीसांनी पणदूर फुलांनजीक गाडी आडवी घालत फिल्मी स्पटाई ताब्यात घेतले यात तपास अधिकारी सागर शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी स्वप्नील तांबे,अजय फोडेकर,महिला कर्मचारी गोलतकर आदि सहभागी झाले होते. त्यानंतर त्याची तहसिलदारा समोर झाडाझडती घेण्यात आली असता त्याच्या कडून 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे हा या सर्व गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार असून जिल्ह्यातील अनेकांना त्याच्या कडून गांजा पुरवठा होत होता असे पोलीसाचे म्हणने आहे मात्र तो कोठून आणत होता हे अद्याप पोलीसांना सापडले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार ताब्यात, बाॅबी नंतर कणकवलीतील सनी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 10:34 AM