डीआरआयची मोठी कारवाई; १९ लाखांच्या बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 07:57 PM2020-01-15T19:57:37+5:302020-01-15T20:01:53+5:30

मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र तीन राज्यात नेटवर्क; बांगलादेश कनेक्शन उघड

Major DRI action; 19 lakh fake currency notes seized | डीआरआयची मोठी कारवाई; १९ लाखांच्या बनावट नोटा जप्त

डीआरआयची मोठी कारवाई; १९ लाखांच्या बनावट नोटा जप्त

Next
ठळक मुद्देआणखी अटक होण्याची व आणखी बनावट नोटा सापडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.बनावट नोटा बाळगणे व त्याचा वापर करणे हा भारतीय सीमाशुल्क कायदा १९६२ च्या कलम ११ अन्वये व कलम १३५ अन्वये  गुन्हा आहे.  

मुंबई - बांगलादेशमधून भारतात आणलेल्या २ हजार व ५०० रुपयांच्या भारतीय बनावट नोटा महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) च्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या. पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यात हे नेटवर्क पसरलेले असून ते नष्ट उध्द्वस्त करण्याचा डीआरआयकडून प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून आणखी अटक होण्याची व आणखी बनावट नोटा सापडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

डीआरआयच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरमध्ये आरोपीला अटक करण्यात आली. २ हजार रुपयांच्या ३८६ नोटा व ५०० रुपयांच्या  ११९१ नोटा आरोपी लालू खान याच्याकडून जप्त करण्यात आल्या. या बनावट नोटांची किंमत १८ लाख ७५ हजार रुपये आहे. लालू खान याची अधिक चौकशी करण्यात येत असून त्याद्वारे मिळत असलेल्या माहितीतून आणखी काही आरोपींपर्यंत पोचण्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आरोपींनी आणखी बनावट नोटा लपवून ठेवल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यापर्यंत पोचण्याचा विश्वास डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बनावट नोटा बाळगणे व त्याचा वापर करणे हा भारतीय सीमाशुल्क कायदा १९६२ च्या कलम ११ अन्वये व कलम १३५ अन्वये  गुन्हा आहे.  युएपीए कायद्यातील सुधारणेनंतर मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळल्यास त्याला दहशतवादी कृत्यामध्ये समावेश केला जातो.

डीआरआयने ऑगस्ट २०१७ मध्ये मुंब्रा येथून एका आरोपीला अटक करुन त्याच्याकडून ६ लाख ९८ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तर, सप्टेंबर २०१७ मध्ये सानपाडा येथून एका आरोपीला अटक करुन त्याच्याकडून ७ लाख ३६ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तर, ऑक्टोबर २०१७ मध्ये वांद्रे कुर्ला संकुल येथून ४ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून २० लाख ५७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला.

Web Title: Major DRI action; 19 lakh fake currency notes seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.