भारतीय नौसेनेची मोठी कारवाई; ३ हजार कोटींचे ड्रग्ज केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 09:36 PM2021-04-19T21:36:25+5:302021-04-19T21:37:24+5:30
Big narcotic haul : या ड्रग रॅकेटमधून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अतिरेकी आणि गुन्हेगारी कारवायांकडे पाठविला जातो.
भारतीय नौसेनाने मोठी कारवाई केली आहे. सरंक्षण दलाच्या प्रवक्त्याने कोची येथे दिलेल्या माहितीनुसार केरळ किनाऱ्यावर संशयास्पदपणे फिरत असलेल्या परदेशी मासेमारी जहाजात चढविण्यात येणारे ३ हजार कोटी रुपये अमली पदार्थ नौसेनाने जप्त केले आहे. तसेच चौघांना ताब्यात घेण्यात आले.
पुढे प्रवक्ते म्हणाले, “या जहाजाच्या तपासणीसाठी जहाजांच्या पथकाने एक बोर्डिंग आणि शोध मोहीम राबविली. त्यामुळे ३ हजार किलोग्रामहून अधिक अमली पदार्थ जप्त केले गेले. तथापि, जप्ती नेमकी कोणत्या ठिकाणी झाली आणि जप्तीची नेमकी वेळ त्यांनी स्पष्ट केली नाही.
अलीकडच्या काळात अमली पदार्थांचा हा सर्वात मोठा जप्त केलेला साठा आहे आणि तेथील रहिवाशांची ओळख जाहीर केलेली नाही. प्रवक्त्याने सांगितले की, नौदल जहाज ‘सुवर्णा’, अरबी समुद्रात पाळत ठेवून असताना एका मासेमारी जहाज संशयास्पद फिरत असताना आढळून आले, त्याचा घेरून तपासणी करण्यात आली. “केवळ प्रमाण आणि किंमतीच्या दृष्टीनेच नव्हे तर मकरान किनारपट्टीवरुन भारतीय आणि मालदीव आणि श्रीलंकेच्या ठिकाणी जाणाऱ्या अवैध मादक द्रव्यांच्या तस्करीच्या मार्गांवर व्यत्यय आणण्याच्या दृष्टीकोनातूनही ही मोठी कारवाई आहे,” पुढे ते म्हणाले एका निवेदनात असे म्हटले आहे की, या ड्रग रॅकेटमधून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अतिरेकी आणि गुन्हेगारी कारवायांकडे पाठविला जातो.
हे जहाज भारत, श्रीलंका आणि मालदीवला जाणार असल्याचा संशय आहे. मकरान हे बलुचिस्तानमधील ओमानच्या आखातीच्या किनारपट्टीवरील किनारपट्टी असलेला प्रदेश आहे आणि मादक द्रव्याच्या व्यापारासाठी कुख्यात आहे. अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, आंतरराष्ट्रीय औषध सिंडीकेट्स देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणार्या तीन-स्तरीय शहरांपैकी एक असलेल्या कोचीवर नजर आहे.