पोलिसांची मोठी कारवाई; भाजपा नेता राकेश सिंहला ड्रग्सप्रकरणी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 07:23 PM2021-02-24T19:23:03+5:302021-02-24T19:23:57+5:30
Drugs Case : पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पामेला गोस्वामीने अटकेनंतर राकेश सिंहवर आरोप केले होते.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजलं असताना भाजपाच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणात भाजपा महिला नेत्या पामेला गोस्वामीला ड्रग्स प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. नंतर आता या प्रकरणात आणखी एका भाजपा नेता राकेश सिंहला अटक करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पामेला गोस्वामीने अटकेनंतर राकेश सिंहवर आरोप केले होते. पोलिसांनी राकेश सिंहच्या दोन्ही मुलांना देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
राकेश सिंह भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय मानले जातात. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून राकेश सिंहचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीला राकेशने कोलकाता हायकोर्टात आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळताच त्याला अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणल्याबद्दल त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाजपा युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याच्या सरचिटणीस पामेला गोस्वामीला १९ तारखेला अटक करण्यात आली होती. त्यांच्या गाडीमध्ये लाखो रुपयांचा अवैध कोकेन सापडला होते. या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी पामेलाने राकेश सिंहवर आरोप केले होते. वरिष्ठ भाजपा नेत्याच्या जवळच्या असलेल्या राकेश सिंहने मला या प्रकरण्यात अडकवण्याचं षडयंत्र केलं आहे. माझ्याकडे सर्व पुरावे असून या प्रकरणाची CID चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी पामेलाने केली होती.
भाजपाच्या युवा नेत्याला पोलिसांनी केली अटक; कारमधून घेऊन जात होती कोकेन
#UPDATE | West Bengal: BJP leader Rakesh Singh arrested by Kolkata Police from Galsi in Purba Bardhaman district, say Kolkata Police https://t.co/k3OrBYOksr
— ANI (@ANI) February 23, 2021
Kolkata Police arrest BJP leader Rakesh Singh and his both sons for obstructing and interfering in the Police investigation. The BJP leader has been arrested from Burdwan while his sons have been arrested from his Kolkata residence.
— ANI (@ANI) February 23, 2021