मला खुश कर, मी काम करून देईन; अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 06:32 PM2022-03-17T18:32:13+5:302022-03-17T18:32:53+5:30

Sexual Abuse Case : पोलिसांचे म्हणणे आहे की, दुहेरी अर्थाच्या शब्दांत बोलणे झाले आहे, असे चित्रपटांमध्ये अनेकदा घडते. त्यामुळे हा सरळसरळ गुन्हा नाही.

Make me happy, I'll make it work; The officer asked the woman for comfort | मला खुश कर, मी काम करून देईन; अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

मला खुश कर, मी काम करून देईन; अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

Next

ग्वाल्हेर / मुरैना - मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील अंबामध्ये एका क्लार्कने कामाच्या बदल्यात विवाहित महिलेशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्लार्कने गरीब महिलांचा बचत गट तयार करण्याच्या बदल्यात विवाहित महिलेशी संबंध ठेवण्याची मागणी केली. विवाहितेने त्याच्याविरोधात अंबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, दुहेरी अर्थाच्या शब्दांत बोलणे झाले आहे, असे चित्रपटांमध्ये अनेकदा घडते. त्यामुळे हा सरळसरळ गुन्हा नाही.

मुरैना जिल्ह्यातील हिंगवली गावात राहणाऱ्या एका विवाहितेने अंबा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिकाऱ्याने मला बचत गट स्थापन करण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानुसार त्याने तिला सांगितले की, तू 15 महिलांचा बसत गट सुरू करतो. मी तुमच्या गटाचे काम अन्न विभागाकडून करून घेईन. महिलेला गट बनवण्याचे आमिष दाखवून कार्यालयात बोलावले, तेथे त्याने तिच्याशी अश्लील भाष्य केले. यानंतर ती घरी पोहोचल्यावर त्याने कॉल केला आणि म्हणाला- अरे! तुझ्याकडे पैसे नाहीत तर शारीरिक संबंध ठेवून मला खुश कर. मी तुझी सगळी कामं करून देईन.

पोलिस कोट - दुहेरी अर्थी संभाषण हा गुन्हा नाही

अंबा पोलिसांनी विवाहितेचा अर्ज घेतला आहे, मात्र या प्रकरणी एफआयआर दाखल केलेला नाही. अंबा टीआय रवींद्र सिंह यांनी सांगितले की, विवाहित महिला आणि अधिकारी यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग सापडले आहे. संभाषणात शारीरिक संबंध ठेवण्यासारखे काही नाही. संपूर्ण संभाषण दुहेरी अर्थाच्या शब्दात बोलले जाते, ज्या प्रकारे संभाषणे चित्रपटांमध्ये होतात. त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही.

दुसऱ्यासाठी पत्नीची हत्या

दुसरीकडे मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात पतीने पत्नीची हत्या केली. पती दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी पत्नीकडून घटस्फोट मागत होता, त्यासाठी ती तयार नव्हती. यावर पतीने चालकासह पत्नीचे तोंड व नाक दाबून वेदनादायक मृत्यू दिला. हा खून अपघात असल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी गाडीचा अपघात झाला असा बनाव रचला. मात्र डॉक्टरांच्या तपासात आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये संपूर्ण सत्य बाहेर आले. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हे प्रकरण रायसेनच्या उदयपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

Web Title: Make me happy, I'll make it work; The officer asked the woman for comfort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.