बिहारच्या नवादामधून एक विचित्र स्कॅम समोर आला आहे. बहुतांश तरुण या अशाप्रकारच्या स्कॅममध्ये अडकतीलच अशी ऑफर देण्यात आली होती. महिलांना प्रेग्नंट करा, १३ लाख रुपये मिळवा. महिला प्रेग्नंट नाही झाल्या तरी ५ लाख कुठेच गेले नाहीत, अशा प्रकारची ऑफर तरुणांना देऊन त्यांना लुटले जात होते. बिहार पोलिसांनी केलेल्या कारवाईत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
अनेक तरुणांना व्हॉट्सअपवर अशाप्रकारचे मेसेज केले जात होते. नोकरी नाहीय, पैशाची तंगी आहे, लखपती बनायचेय तर ही स्कीम तुमच्यासाठी आहे असे मेसेज केले जायचे. यासाठी तुम्हाला जास्त काही करायचे नाहीय. फक्त एका महिलेला प्रेग्नंट करायचेय. तिला जेव्हा मुल होईल तेव्हा तुम्हाला बक्षीस म्हणून १३ लाख रुपये दिले जातील. जरी ती महिला प्रेग्नंट नाही झाली तरी तुम्हाला ५ लाख रुपये मिळतील, असे आमिष यामध्ये दाखविण्यात आले होते.
सुरुवातीला पतीपासून मुले होऊ शकत नसलेल्या या महिला असतील असे फसलेल्या तरुणांना वाटले होते. या मेसेजवर रिप्लाय दिला की त्या तरुणांकडे ७९९ रुपये रजिस्ट्रेशन फी मागितली जायची. यानंतर तरुणांना महिलांचे फोटो पाठविले जायचे. यापैकी एक महिला सिलेक्ट करण्यास सांगितले जायचे. तरुणांना महिलेला सिलेक्ट केले की त्यांच्याकडे ५ ते २० हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून मागितले जायचे. ही रक्कम त्या महिलेच्या सुंदरतेवर अवलंबून होती.
हवस आणि पैशाचे आमिष दिसल्याने भुललेले तरुण ती रक्कम देखील त्या ठगांना द्यायचे. यानंतर हे ठग गायब व्हायचे. हे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने कोणाशीच संपर्क व्हायचा नाही. अशातच एका फसलेल्या तरुणाने पोलीस ठाणे गाठले आणि सायबर क्राईमने तपास सुरु केला व या टोळीपैकी ८ जणांना पकडले आहे.