मालेगाव (नाशिक) :- शहरातील सरदारनगर भागात एका खोलीत १ लाख ५० हजार ६० रुपये किमतीचे १०५ ड्रम मध्ये भरलेले बायोडिझेल सदृश्य द्रव शहर पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केले आहे. पथकाने बायोडिझेलच्या सदृश्य द्रव्य व इतर मुद्देमाल असा १ लाख ५८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे तर मूळ मालक फरार झाला आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बायोडिझेल सदृश्य अड्डा उद्ध्वस्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अवैधरित्या बायोडिझेल विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील सरदार नगर भागातील घर क्रमांक १४ मध्ये बायोडिझेल सदृश्य द्रवाचा साठा असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी ,पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांच्या पथकाने छापा टाकला असता खोलीत १ लाख ५० हजार रुपये किमतीचे बायो डिझेल सदस्य द्रव्य, इलेक्ट्रिक मोटर व इतर साहित्य आढळून आले. पथकाने मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मोसिन खान फिरोज खान ( २७) सलाउद्दीन अहमद सालेह या दोघांना अटक करण्यात आली आहे तर या अड्याचा मूळ मालक असद अकिल अहमद हा फरार झाला आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.